spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

Rahul Gandhi in Mumbai : धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून काँग्रेस नेते राहुल गांधींचा धारावीकरांशी संवाद

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज धारावी दौऱ्यावर आलेआहेत. गुजरातमध्ये काँग्रेसची बैठक आहे. त्याआधी राहुल गांधी यांनी मुंबईतील धारावीला भेट दिली. या ठिकाणी चर्मोद्योग व्यावसायिकांना भेट देऊन संवाद साधला. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची चर्चा होत असताना दुसरीकडे राहुल गांधी थेट धारावीत जाणार आहेत.

Rahul Gandhi in Mumbai Live Updates Dharavi Redevelopment : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज धारावी दौऱ्यावर आलेआहेत. गुजरातमध्ये काँग्रेसची बैठक आहे. त्याआधी राहुल गांधी यांनी मुंबईतील धारावीला भेट दिली. या ठिकाणी चर्मोद्योग व्यावसायिकांना भेट देऊन संवाद साधला. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची चर्चा होत असताना दुसरीकडे राहुल गांधी थेट धारावीत जाणार आहेत.

काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी ६ ते ८ मार्च २०२५ दरम्यान मुंबई आणि अहमदाबादच्या दौऱ्यावर आहेत. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते पक्षाचे स्थानिक अस्तित्व बळकट करणे आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. तर, मुंबईतील राहुल गांधींच्या भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. धारावीत राहुल गांधींची चर्मोद्योगातील कामगारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा होणाऱ्या परिणामाबाबतही संवाद साधणार आहेत. तर, विमानतळावर काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत.

मुंबईतील धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून चालू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. शिवसेनेने (ठाकरे) हा विषय लावून धरलेला असतानाच आता राहुल गांधी देखील यामध्ये सहभागी होत आहेत. आज (गुरुवार, ६ मार्च) ते मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत ते धारावीला भेट देतील आणि तिथल्या मजुरांशी, व्यावसायिकांशी संवाद साधतील. देशातील अनेक उद्योगधंद्यांची कंत्राटं अदाणी समूहाला देण्यात आली आहेत. अनेक उद्योग हे व्यावसायिक गौतम अदाणींच्या ताब्यात दिले आहेत. यावरून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. अदाणींच्या मार्फत केंद्र सरकार देशाची संपत्ती लुटत असल्याचा आरोप करत आहेत. अशातच धारावी पुनर्वसन प्रकल्पाचं कंत्राट अदानी समूहाला देण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून आधीच राज्यातील महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आले आहेत.

राहुल गांधी थोड्याच वेळात मुंबई काँग्रेसमधील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील व आगामी महापालिका निवडणुकीचा आढावा घेतील. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार वर्षा गायकवाड यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत. राहुल गांधींचा हा दौरा महाराष्ट्र काँग्रेससाठी धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जात आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत मुंबईत त्यांची उपस्थिती स्थानिक पातळीवर पक्षाला बळकटी देण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.मुंबईतील कार्यक्रम आटपून राहुल गांधी अहमदाबादला जाणार आहेत. तिथे ते पक्षबांधणीचं काम पाहणार. नेते, पदाधिकारी आणि मागी निवडणुकीतील उमेदवारांना भेटणार आहेत.

हे ही वाचा:

मुंबईची कुठलीही एक भाषा नाही; RSS नेते भैय्याजी जोशीं यांचं वादग्रस्त वक्तव्य

‘मुख्यमंत्र्यांनी Jaykumar Gore यांचा राजीनामा घ्यायला हवा’ – Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss