spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Rahul Gandhi : राहुल गांधींची गौतम अदानीवर जोरदार टीका, काय म्हणाले Rahul Gandhi?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानीवर जोरदार टीका केली आहे. तसेच (SEC) अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेच्या सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने गंभीर आरोप केले आहे. सरकारी अधिकाऱ्यांना लाच देणे, तसेच अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक करणे असे आरोप गौतम अदानी यांच्यावर करण्यात आले आहेत. याप्रकरणी अदानी यांचे भाचे सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी तसेच एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडच्या अधिकाऱ्यांवरही आरोप लावण्यात आले आहेत. यामुळे आता अदानी समूह हा अडचणीत आला असून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्यावरून मोठी मागणी केली आहे. आज दिल्लीमध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदेत त्यांनी अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली आहे. राहुल गांधींनी या पत्रकार परिषेदेत अदानीसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका करत म्हटल आहे की, “गौतम अदानी फसवणूक प्रकरणावर आम्ही गप्प बसणार नाही. हा मुद्दा आम्ही संसदेतही मांडणार आहोत. अदानींना भाजप सरकार वाचवेल, हेही आम्हाला माहिती आहे. अदानी यांनी २ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, तरीही त्यांना अजून अटक करण्यात आलं नाही, असे अमेरिकन तपास संस्थेने म्हटले आहे. अदानी आताही तुरुंगाबाहेर का आहेत? त्यांना तात्काळ अटक करावी. त्यांच्यावरील आरोपांची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीही करावी”

जर अदानी जेलमध्ये गेले तर पंतप्रधान मोदीही जातील
जोपर्यंत गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मादी हे एकत्र आहे, तोपर्यंत ते सुरक्षित आहेत. गौतम अदानीवर कोणतीही कारवाई करणार नाही हे आम्हाला माहिती आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र हे अदानीच्या पाठीशी आहेत. ते त्यांचे पूर्णपणे संरक्षण करत आहे. गौतम अदानी हे जेलमध्ये गेले तर पंतप्रधान मोदीही जातील. गौतम अदानींशी भाजपचा निधी जोडलेला आहे, असा मोठा आरोप राहुल गांधींनी केला आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी म्हटले आहे की, गौतम अदानीवर जे घोटाळ्याचे आरोप झाले आहेत, ते मी केले नाही. अदानीं यांची चौकशी झाली पाहिजे. भारतामध्ये अदानी रोज भ्रष्टाचार करत आहेत. संपूर्ण देश हा अदानींच्या ताब्यात आहे, असेही घणाघात आरोप राहुल गांधींनी केला आहे.

हे ही वाचा:

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३  टक्के मतदान

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss