spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

ज्या बैठकीत अमित शहा, अदाणी बसले होते ती बैठक… Rahul Gandhi यांचे खळबळजनक विधान

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच काँग्रेसचे (Congress) नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा आज (शनिवार, १६ नोव्हेंबर) पार पडली. यावेळी त्यांनी भाजपसह (BJP) महायुतीवर (Mahayuti) जोरदार हल्लाबोल केला.

राहुल गांधी यावेळी म्हणाले, “ही लढाई विचारधारेची आहे, एकीकडे महायुती दुसरी कडे महाविकास आघाडी आहे. देश संविधानाने चालला पाहिजे, प्रधानमंत्री म्हणतात हे केवळ पुस्तक आहे. हे फक्त पुस्तक नसून संविधान देशाचा डीएनए आहे. सर्व महापुरुषांचे विचार संविधानात आहे. आमच्यासाठी हे नवीन नाही, हे इतिहास कालीन विचार आहे. प्रधानमंत्री आणि त्यांची टीम लपून संविधानाची हत्या करतात. ज्या बैठकीत अमित शहा, अदाणी बसले होते ती बैठक सरकार चोरी करण्याची होती. संविधानात कुठे लिहिलं करोड रुपये देऊन आमदार खासदार यांना खरेदी करायचं. बीजेपीचे लोकं मोदी, शाह, धारावीची जमीन, गरीबाची जमीन त्यांचे मित्र गौतम अदाणी यांना देणार होते म्हणून सरकार चोरी केलं. महाराष्ट्रातील सरकार चोरी केली. धारावी जमीन गौतम अदाणी यांना देण्यासाठी आमदार खरेदी केले गेले,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “मोदी म्हणतात, राहुल गांधी आरक्षण विरोधी आहे, मोदीची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. संविधानावर बीजेपी आक्रमण करत आहेत. 50 टक्के आरक्षणाची भित आम्हाला तोडायची आहे, मोदी त्याला तोडू नाही शकले. मोदींची मेमरी लॉस झाली आहे. आम्ही जातीय जन गणना करण्याची विनंती केली. लढाई संविधानाची आहे. नरेंद्र मोदी जातीय जनगणनेच्या विरोधात आहेत. 90 अधिकारी जीएसटी बनवतात..नंतर बजेट सादर केलं जातं. दलित आदिवासी यांना जोडल तर 100 पैकी 6 टक्के निर्णय 3 अधिकारी घेतात. भारतात 200 मोठ्या कंपनी आहेत..यात मालक एकही मागास वर्गीय नाही. मोठमोठ्या खाजगी शाळा, दवाखाने बघितले त्यातही मागासवर्गीय नाही. 90 टक्के लोकांसाठी मोदी काम करत नाही.. त्यांना सर्वसामान्य लोकांचा जीएसटी आणि जमिनी घेण्यासाठी बसविले आहे. 5 टक्के लोक सरकार चालवत आहे. धारावी जमीन अदानी कडे देत असाल तर शेतकऱ्यांना साठी देखील सरकारने काम केलं पाहिजे.”

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss