Sunday, June 4, 2023

Latest Posts

Rahul Narwekar उपस्थित केला सवाल, २ महिन्यात निर्णय कसा घेऊ

सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात राज्यातील सत्ता संघर्षाबाबत आपला निकाल हा दिला आहे. या निकालवेळी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते की, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे पहिल्यासारखी स्थिती कायम करता येऊ शकत नाही.

सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात राज्यातील सत्ता संघर्षाबाबत आपला निकाल हा दिला आहे. या निकालवेळी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते की, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे पहिल्यासारखी स्थिती कायम करता येऊ शकत नाही. तर यावेळी १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे म्हणजेच राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर याबाबत आज राहुल नार्वेकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

आज राहुल नार्वेकर म्हणाले आहेत की, “माझ्याकडे ५४ आमदारांविरोधात 5 याचिका आहेत. लवकरच निर्णय घेणार. ठाकरे गटाच कोणतही निवेदन माझ्याकडे आलेलं नाही”.“घाईत चुकीचा निर्णय घेतल्यास लोकशाहीसाठी घातक ठरेल. १६ आमदारांच्या अपात्रतेवर निपक्षपाती निर्णय घेणार” असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. तसेच पुढे ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय, त्याच मी अभिनंदन करतो. संवैधानिक शिस्त पाळत कोर्टाने विधिमंडळाकडे अधिकार दिला आहे” असं राहुल नार्वेकर म्हणाले. माझ्याकडे ५४ आमदारांविरोधात ५ याचिका आहेत, लवकरच निर्णय घेणार असल्याच त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २ महिन्यात निर्णय घ्यावा, असा अल्टीमेटच राहुल नार्वेकर यांना दिला आहे. मात्र नार्वेकर यांनी मी चौकशी पूर्ण झाल्यावरच निर्णय घेणार. न्यायालयाला निर्णय घ्यायला १० महिने लागले मी २ महिन्यात निर्णय कसा घेऊ, असा सवाल राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच ते पुढे म्हणाले, ठाकरे गटाचं कोणतही निवेदन माझ्याकडे आलं नाही. १६ आमदारांच्या अपात्रतेवर निपक्षपाती निर्णय घेणार. हा निर्यण घेताना दिरंगाई करणार नाही आणि घाईही नाही, असे नार्वेकरांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

नाल्यातून किती खोल गाळ काढला याची आकडेवारी जाहीर करा – आशिष शेलार

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss