spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्री पदावर पूर्णविराम बसण्याची शक्यता; मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री रायगड दौऱ्यावर सोबत

नाशिक व रायगड पालकमंत्री पदाचा तिढा कायम असून गेली अनेक दिवस त्यावर चर्चा होताना दिसत आहे. लवकरच हा तिढा सुटण्याची चिन्हं दिसत आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने नाशिकचे पालकमंत्री पद भाजपा सहज सोडेल असे वाटत नाही. तर दुसरीकडे रायगड पालकमंत्री पदाबाबत आज तोडगा निघण्याची शक्यता आहे.

Raigad Guardian Minister: नाशिक व रायगड पालकमंत्री पदाचा तिढा कायम असून गेली अनेक दिवस त्यावर चर्चा होताना दिसत आहे. लवकरच हा तिढा सुटण्याची चिन्हं दिसत आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने नाशिकचे पालकमंत्री पद भाजपा सहज सोडेल असे वाटत नाही. तर दुसरीकडे रायगड पालकमंत्री पदाबाबत आज तोडगा निघण्याची शक्यता आहे.

नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे आशावादी आहेत तर दुसरीकडे आदिती तटकरे यांच्या जागेवर भरत शेठ गोगावले यांचा दावा कायम आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने भाजपासाठी ही मोठी संधी आहे. त्यासाठीचे मोठे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे भाजप नाशिकचे पालकमंत्री पद सहजासहजी सोडेल असे वाटत नाही. गेल्या दोन दिवसांपासून गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री असल्याचे संकेत भाजपाच्या गोटातून देण्यात येत आहे. तर आज तशी बॅनरबाजी पण करण्यात येत आहे. नाशिक सारख्या ठिकाणी कोणी ऍक्टिव्ह पालकमंत्री हवा. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रायगड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजून मिटलेला नाही. असे असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रायगड दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. रायगडकडे जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाड येथे थांबले. त्यांनी चवदार तळ्याला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पुढील कार्यक्रमासाठी जातांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या वाहनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्रीपदावर दावा करणारे मंत्री भरत गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांना सोबत घेतले.

गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेते गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असल्याचे संकेत भाजपाच्या गोटातून समोर येत आहेत. तर आज मंत्री गिरीश महाजन यांचे नाशिकमध्ये लागलेले बॅनर चर्चेत आले आहे. हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री आशयाचे बॅनर शहरात लागले आहे. पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाही समर्थकांकडून बॅनरबाजी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा नाशिकचा कारभार गिरीश महाजन यांच्याकडे येणार अशी भाजपच्या गोटात चर्चा सुरू आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होणार अशी चर्चा असतानाच ही बॅनरबाजी होत आहे.

रायगड पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती फडणवीसांनी केली होती. त्याला शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी विरोध केला. गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्तारोकाचा प्रयत्न केला. रायगड पालकमंत्रीपदाला होत असलेला विरोध पाहता, दावोस दौऱ्यावर असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. रायगडसोबतच नाशिक जिल्हा पालकमंत्रीपदाबद्दलही वाद आहे. येथेही एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी तटकरे, गोगावले आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत प्रवास करुन पालकमंत्रीपदावर तोडगा सांगितला असेल तो तोडगा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मान्य होईल का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

हे ही वाचा:

Raksha Khadse: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार

Dhananjay Munde: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा अजित पवारांकडे राजीनामा ; करूणा मुंडेंचा मोठा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss