spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

Parbhani मध्ये पावसाची तुफान बॅटिंग, तर अजित पवार कारने पोहचले बीडला…

ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवड्यापासून पावसाने संपूर्ण राज्यभरात विश्रांती घेतली होती. पण काल रात्रीपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवड्यापासून पावसाने संपूर्ण राज्यभरात विश्रांती घेतली होती. पण काल रात्रीपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. दरम्यान या पावसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचे हेलिकॉप्टर थांबवले आहेत . आत्ता ते दोघंही परभणी ते बीड हा प्रवास कारने करणार आहेत. हवामानातील बदल आणि पाऊस यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

आज २७ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar), यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा सभेचे परभणीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे “शाशन आपल्या दारी” या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी सर्व नेते जमणार आहेत. पण आत्ता हा कार्यक्रम सुरु असताना पावसाचा जोर अचानक वाढला आहे. पाऊस जास्त असल्यामुळे लाभार्थ्यांसह पोलिस आणि शासकीय यंत्रणेची खूप धावपळ झाली. कार्यक्रमातील अनेक महिला, अधिकारी, महिला कर्मचारी त्यांना मिळेल ते डोक्यावर घेऊन पावसापासून बचाव केला आहे.

बीड मध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा जोरदार पडायला सुरुवात केली आहे. या पावसामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेलिकॉप्टरने बीडला जाण्याचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे अजित पवार हे बीडला कारने रवाना झाले आहेत. काही तासानंतर अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. पावसामुळे त्यांची रॅली काढणे त्यांनी रद्द केली आहे. अजित पवार यांचा जाहीर सभेला थोड्या वेळानंतर सुरुवात होणार आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकनांची चांगलीच तारांबळ उडाली. दादरमध्ये सुद्धा पावसाने जोर धरला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये खेळायला येणाऱ्या मुलांनी देखील पावसाचा आनंद घेतला. गरमीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. ठाण्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. आज पडलेल्या पावसामुळे वातावरणात थोड्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.

हे ही वाचा:

भाजपने देशभरात जो द्वेष पसरवला आहे त्यातूनच अहमदनगरची घटना, नाना पटोले

Uddhav thackeray यांनी हिंगोलीतून सरकारवर केली जोरदार टीका, शासन आपल्या दारी, थापा मारते…

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांचे जनतेला मोठे आश्वासन, परभणीमध्ये विकासाची गंगा नक्की आणणार…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss