spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून निघून बाण उरले फक्त खान, Raj Thackeary यांचा हल्लाबोल

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. अश्यात काल दिंडोशी मालाड येथे मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर विधानसभेचे उमेदवार भास्कर परब यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी या सभेत राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच राज ठाकरें यांनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली.

 

राज्यामध्ये या पाच वर्षांमध्ये जे काही घडलं ते तुम्ही पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक चिन्ह गेले. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत खान राहिले आहेत. वर्सोव्यात हारून खान यांना तिकीट दिले आहे. उर्दुमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवाराने पत्रक काढले आहे, राज ठाकरेंनी अशी टीका केली. मराठवाड्यामध्ये स्लोगन चालायचं बाण हवा की खान परंतु दुर्दैव असं झालं की उद्धव ठाकरे कडून बाण निघून गेला उरले फक्त खान शिवसेना ठाकरे गटाचा वर्सोवाचा उमेदवार असलेल्या हरून खानच्या नावातच हरू आहे. त्यामुळे तो जिंकणार कसा?, राज ठाकरेंनी असा प्रश्न केला.

शिवाजी पार्कवरील लाईट बंद, राज ठाकरे आक्रमक
दिवाळी आपण तुळशीच्या लग्नापर्यंत साजरी करतो. आपण 14-15 वर्षांपासून दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा करतो. परंतु काल सगळे अचानक लाईट सर्व बंद करून टाकले. पंतप्रधान नरेंद मोदी यांची 14 नोव्हेंबरला शिवाजी पार्कला सभा आहे. या कारणामुळे ते लाईट काढून टाकले आहेत, असं राज ठाकरें यांनी म्हंटल आहे. हिंदूंच्या सणावर बंदी आणली होती, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली होती. हिंदुत्ववादी पंतप्रधान शिवाजी पार्कवर येत आहेत आणि त्यांच्यासमोर तुम्ही दिवे बंद करतात. या जागी जर राहुल गांधी असते तर समजू शकलो असतो. राहुल गांधी यांच्या डोक्यात दिवे पेटत नाही. उद्धव ठाकरे यांना लाईट कमी लागतो आणि त्याहून हिंदूंचा, राज ठाकरेंनी असा हल्लाबोल केला.

मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळणार?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र धामधूम सुरु असताना IANS-MATRIZE च्या सर्व्हेची आकडेवारी समोर आलेली आहे. महाविकास आघाडीत मुंबईमध्ये सर्वाधिक जागा लढवणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ५ ते ९ च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला ४ ते ८ जागा मिळू शकतात. तर याशिवाय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला ०-४ या दरम्यान जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पार्टीला ० ते ४ जागा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीला मुंबईमध्ये ४१ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे, तर त्यांना १० ते १३ जागा दरम्यान मिळतील, असा अंदाज IANS- MATRIZE ने दर्शविण्यात आला आहे. महायुतीमध्ये भाजपला १३ ते १७ जागा दरम्यान मिळू शकतात, असा अंदाज IANS- MATRIZE नं वर्तवला आहे.

तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये ७ ते ११ दरम्यान जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ ते ५ च्या दरम्यान जागा मिळू शकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुतीला मुंबईमध्ये २१ ते २६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर महायुतीला ४७ टक्के मिळू शकतात, असा सर्व्हेचा अंदाज दर्शविण्यात आला आहे. तसेच मुंबईमध्ये मनसेला ० ते ४ दरम्यान जागा मिळू शकतात आणि तसेच इतरांना ० ते ४ जागा मिळू शकतात, असा अंदाज IANS- MATRIZE द्वारा वर्तवला आहे.

हे ही वाचा:

IANS Matrize Survey: मोठी बातमी! महानिवडणुकीचा सर्वे आला समोर… महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss