Friday, March 29, 2024

Latest Posts

राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना देखील घेतले धारेवर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज नाशिकमधल्या काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि आपल्या अडचणी सांगितल्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज नाशिकमधल्या काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि आपल्या अडचणी सांगितल्या. त्यावेळी अडचणीच्या काळात तुम्ही मला भेटायला येता आणि मतदान पिळवणूक करणाऱ्यांना का करता? असा प्रश्न राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना विचारला आहे. तसंच शेतकरी प्रतिनिधींसह आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र शेतकऱ्यांना उद्देशून त्यांनी जे वक्तव्य केलं ते चांगलंच चर्चेत आलेलं बघायला मिळत आहे.

शेतकरी प्रतिनिधींनीसह अनेक शेतकऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी आम्हाला हे सांगितलं आहे की तुम्ही परत या. तुमच्या जमिनींचे जे प्रश्न आहेत त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी तुमचं बोलणं करुन देतो. तुम्हाला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे आम्ही आज समाधानी आहोत. आम्ही आमच्या जमिनीला आईच्या ठिकाणी मानतो. आज राज ठाकरेंनी आमच्या जमिनीबाबतच्या समस्या जाणून घेतल्या. आमच्या जमिनींचे बँकेकडून लिलाव केले जात आहेत. त्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या आहेत. राज ठाकरेंनी आम्हाला मदतीचं आश्वासन दिलं आहे. राज ठाकरेंना आम्ही हे देखील सांगितलं की तुम्ही अडचणी आल्या की माझ्याकडे येता आणि मतदान दुसऱ्याला करता असंही म्हणाले. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्यासह आहोत. आम्हाला मदतीचं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं आहे.

मध्यंतरी शेतकऱ्यांनी संप केला होता. तेव्हा काही शेतकरी बांधव मला भेटायला आले होते. मी त्यांना सांगितलं, अडचणींच्या काळात माझ्याकडे येता आणि मतदानाच्या वेळी मतदान त्यांना करता. त्यावेळी मला शेतकरी बांधव म्हणाले साहेब अडचण वेगळी आणि मतदान वेगळं. जे तुम्हाला मदत करत नाही त्यांना तुम्ही मतदान करत आलात तर अडचणींच्या काळात तुम्ही माझ्याकडे का येता? ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करतो त्यांना तुम्ही मतदान केलंत की नाही? आपण काय करतो आहोत त्याचं भान ठेवा. असा सवाल शेतकऱ्यांस सरकारला देखील लगावला आहे.

हे ही वाचा:

RCB vs GT, आरसीबी प्लेऑफचे स्वप्न होणार का साकार?

सुषमा अंधारेंच्या सभेवरून नेमकं घडला काय प्रकार ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss