विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ३० जानेवारीला पदाधिकारी मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी प्रथमच विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. त्यांनी निवडणुकीच्या निकालावर शंका व्यक्त केली. शरद पवारांचे ८ खासदार, १० आमदार निवडून येतात. लोकसभेला अजित पवार यांचा १ खासदार आणि ४१ आमदार निवडून येतात. चार महिन्यात एवढा फरक पडला लोकांच्या मनात? काय झालं, कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली. आता राज ठाकरे यांच्या आरोपांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्यारोप केला आहे.
अमोल मिटकरी यांनी नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांबद्दल मांडलेल्या भूमिकेवरून टीका केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले,” राज ठाकरेंनी अजित पवारांसारखं पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागलं पाहिजे, त्यांना नेहमीच उशिरा उठून चिंतन करण्याची सवय आहे. त्यामुळे विधानसभेला स्वतःच्या घरात झालेल्या दारुण पराभवांनंतर दीड महिन्यांनी ४२ जागा कशा आल्या हा शॉक त्यांना दीड महिन्यांनी बसलाय. मात्र, आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत, यावर त्यांनी भाष्य करावं. यासाठी त्यांनी पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागलं पाहिजे असा सल्ला अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
आज झालेल्या मनसेच्या मेळाव्यात लोकांनी आपल्याला मतदान केलं, पण केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. अशा प्रकारच्या निवडणूक लढवायच्या असतील तर निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. कोणी कोणत्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो, अशा गोष्टी होत असतात, असे राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा :