गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण जागर यात्रा काढली आहे. या यात्रेत आज राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे सहभागी झाल्या होत्या. तर, राज ठाकरे यांनी रायगडच्या कोलाड येथून कोकणी बांधवांशी संवाद साधला. यावेळी मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai Goa highway) चाळण झाली आहे. या मुद्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली. कोकणी बांधवांनी जमिनी विकू नयेत असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलं
यावेळी बोलत असताना राज ठाकरे म्हणाले आहेत की, गेल्या १५ वर्षात मुंबई-गोवा महामार्गावर अपघातामुळं अडीच हजार जणांचा मृत्यू झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. १७ वर्षापासून हा रस्ता का होत नाही, याचे उत्तर म्हणजे तुम्हाला राग येत नाही असे राज ठाकरे म्हणाले. जी माणसे तुम्हाला लुटत आली त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देत आहात. तुम्ही जागृत राहा असे आवाहन कोकणी बांधवांना असल्याचे राज ठाकरे म्हणाले. कोकणी बांधवांना गेली अनेक वर्ष खड्डे सहन करावे लागतात. याचा तुम्हाला राग कसा येत नाही असे राज ठाकरे म्हणाले. या रस्त्यावर खड्यामुळे किती अपघात झाले असतील किती माणसे गेली असतील असे राज ठाकरे म्हणाले. आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमध्ये अंडरवेअरवर बसवलं. सरकार कोणतही असो. आजचं असो किंवा कालचं असो. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेलं नसतं असे राज ठाकरे म्हणाले. तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले आहेत की, १९९५ साली बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की, मुंबई-पुणे रस्ता दोन तासात पार करता येईल, असा तयार करायचा आहे. ज्या महाराष्ट्रानं प्रत्येक वेळी देशाचं प्रबोधन केलं, देशाला दिशा दिली. मुंबई-एक्सप्रेस झाल्यावर देशाला कळाले की अशा प्रकारचा रस्ता बांधला जाऊ शकतो असे राज ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबई-पुणे रस्ता झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. या रस्त्यानंतर चांगले रस्ते होऊ लागल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबई-पुणे रस्ता हा देशाला दिशादर्शक रस्ता असल्याचे ठाकरे म्हणाले. ज्या महाराष्ट्रानं देशाला आदर्श घालून दिला, त्या महाराष्ट्रातील मुंबई-गोवा रस्त्याची अवस्था काय असे राज ठाकरे म्हणाले.
“कोणत्या सरकारचा मुर्खपणा माहित नाही, पण हायवेवर पेव्हर ब्लॉक टाकले आहेत. किती पैसे खायचे यालाही मर्यादा असते. जगभर कुठेही गेलात तर तुम्हाला कॉन्क्रिटचे रस्ते मिळतात. पेव्हर ब्लॉक फुटपाथवर असतात. टेंडर काढायचे आणि तुम्हाला दिवसभर या खड्ड्यांतून घेऊन जायचं”, असं राज ठाकरे म्हणाले. “मी हात जोडून कोकणी बांधवांना विनंती करतो की जमिनी विकू नका. हा रस्ता असा (अपूर्ण) ठेवण्यामागचं सर्वांत मोठं कारण अत्यंत चिरीमिरीमध्ये जमिनी विकत मिळत आहेत. अत्यंत मामुली किंमतीत जमिनी विकत घेतली जात आहेत. जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल, तेव्हा शंभरपट किंमतीत तुमच्याच जमिनी व्यापाऱ्यांना विकल्या जाणार आहेत. पैसे ते कमवणार, आणि तुम्ही तसेच राहणार”, असं राज ठाकरे म्हणाले.
“शस्त्रक्रिया झाली नसती तर मीही चाललो असतो. पण आमचा अमित, पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, वसंत मोरे, राजू पाटील ही सर्व मंडळी या रस्त्यांवर चालले. काय चाळण झालीय या रस्त्याची. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की कोकणी माता भगिनींना गेली अनेकवर्षे खड्डे सहन करावे लागताहेत. तेच तेच आमदार-खासदार निवडून देतात आणि तेच तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा करतात. या रस्ते अपघतात किती लोक गेले असतील? रस्त्यावर पडलेले खड्डे भरता येता पण माणसाचं आयुष्य पुन्हा आणता येत नाही”, असंही राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
अँटिलिया स्फोटक प्रकरणी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर
सरकारच्या कांदा खरेदीवर निर्णयावर स्वाभिमनी शेतकरी संघटनेची जोरदार टीका