Thursday, March 28, 2024

Latest Posts

Raj Thackeray यांनी काढले अजित पवारांचे व्यंगचित्र, म्हणाले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे संपूर्ण देशात तसेच तरुणाच्या मनात एक प्रसिद्ध राजकारणी म्हणून आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे संपूर्ण देशात तसेच तरुणाच्या मनात एक प्रसिद्ध राजकारणी म्हणून आहेत. पण राज ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून देखील सर्व ठिकाणी परिचित आहे. आज जागतिक व्यंगचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव २०२३ चे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज ठाकरे यांनी सर्व व्यंगचित्र पाहून कलाकार मंडळींचे कौतुक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यंगचित्र काढण्याचा आग्रह केला. गेले दोन चार दिवस जे काही चालले आहे. ते पाहून अजित पवार यांचे चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. मला ते कितपत येईल ते माहिती नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना सांगितले. आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून ते अनेकदा राजकीय घडामोडींवरही भाष्य करतात. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यावरही त्यांनी कार्टुनच्या माध्यमातून जबरी प्रहार केला होता.

गेल्या २-३ दिवसांपासून राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेले दिसून आले आहे. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेतेही या निर्णयाला विरोध करत आहेत. मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या निर्णयाचं समर्थन करत कार्यकर्त्यांनाच सुनावल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, अजित पवार हेच सध्याच्या घडामोडीत केंद्रस्थानी आहेत. मग, राज ठाकरेंनी व्यंगचित्र दिनानिमित्त कलाकारांच्या आग्रहाखात अजित पवार यांचंच चित्र रेखाटलं. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारं एखादं कार्टुन काढा, असा आग्रह येथील कलाकारांनी केला होता. त्यावर, राज यांच्या कुंचल्यातून अजित पवार प्रकटले.

तसेच शांत आणि गप्प बसलेले, नजरेतून आपला रोख दर्शवणारे अजित पवार यांचे चित्र राज ठाकरे यांनी रेखाटले आहेत. यावेळी, कलाकारांनी राज ठाकरेंना चित्रासोबत एखादं कॅप्शन लिहिण्याची विनंती केली. त्यावर, राज यांनी आता काय लिहू तुम्हीच सांगा? गप्प बसा असे लिहू का? असा प्रतिप्रश्न राज यांनी केला. त्यावर, उपस्थितांनी टाळ्या वाजवून राज यांना दादा दिली. दरम्यान, मला उभे राहून व्यंगचित्र काढायची सवय नाही, त्यामुळे अजित पवार जसे पाहिजे, तसे जमले नाहीत. मला बाळासाहेबांसारखीच एका जागी बसून व्यंगचित्र काढण्याची सवय आहे. म्हणून, जे आहे ते गोड मानून घ्या, असेही राज यांनी म्हटलं.

हे ही वाचा : 

शरद पवारांचा राजीनामा फेटाळल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

मोठी बातमी, शरद पवारांचा राजीनामा फेटाळला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss