spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंना ठाकरेंच्या मनसेला बसला मोठा धक्का, नेमकं कुठे गणित चुकलं जाणून घ्या…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी सध्या आव्हानांचा काळ आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर खचून गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जोश भरण्याचं तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी टिकवून ठेवण्याचं सर्वात मोठा आव्हान आहे. आधी विधानसभा निवडणुकीचे निकाल त्यानंतर आता राज ठाकरेंच्या मनसेला आणखी एक धक्का बसला आहे. मागच्या महिन्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालाने सर्वात जास्त भ्रमनिरास कोणाचा झाला असेल, तर मनसैनिकांचा आणि राज ठाकरेंचा समर्थकांचा कारण निवडणूक प्रचारात मनसेची हवा दिसत होती. पण निकाल बिलकुल या उलट लागले. महाविकास आघाडीचा जितका मोठा दारुण पराभव झाला, त्याहीपेक्षा मोठा पराभव मनसेचा झाला. ही सलग तिसरी विधानसभा निवडणूक आहे, ज्यात मनसेने इतकी खराब कामगिरी केलीय. २००९ च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता त्यानंतर झालेल्या तिन्ही विधानसभा निवडणुकीत मनसेला छाप पाडणारी कामगिरी करता आलेली नाही. फक्त २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते.

त्यानंतर २०१४ मध्ये एक, २०१९ मध्ये एक आणि २०२४ मध्ये शुन्य अशी स्थिती आहे. खरंतर २०१४ मध्ये मोदी लाट होती, त्यावेळी मनसेकडून अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे जनतेने मनसेकडे पाठ फिरवली. पण त्यानंतरच्या दोन्ही २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला जनतेचा विश्वास जिंकता आलेला नाही. हे निकालावरुन दिसून येतं. लोकसभा निवडणुकीत मनसेने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. म्हणून लोकसभेची एकही जागा लढवली नाही. विधानसभा मनसेने स्वतंत्रपणे लढवली. यावेळी किमान चार ते पाच आमदार निवडून येतील अशी अपेक्षा होती. पण एकही आमदार निवडून आला नाही. अत्यंत दारुण पराभव झाला. मतपेटीतून जनतेने त्यांच्या मनात काय आहे, ते सांगितलं.

आता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर खचून गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जोश भरण्याच तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी टिकवून ठेवण्याच मोठं आव्हान आहे. त्यात आता कोकणातून मनसेसाठी चांगली बातमी नाहीय. चिपळूण मनसेचे शहर प्रमुख अभिनव भुरण यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षातील स्थानिक राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याच त्यांनी सांगितलं. स्थानिक पातळीवरील नेते विश्वासात घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याचं भुरण यांनी पत्रात म्हटलं आहे. वर्षानुवर्षे फक्त स्वतःचा फायदा करायचा आणि पक्षाला वाढवण्यासाठी स्थानिक नेतृत्व काम करत नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.

Latest Posts

Don't Miss