spot_img
spot_img

Latest Posts

राज ठाकरे यांनी साधला फोनवरून आंदोलकांशी संवाद

जालन्यातील झालेल्या लाठीचार्ज प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून छत्रपती संभाजीनगर, जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत

जालन्यातील झालेल्या लाठीचार्ज प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून छत्रपती संभाजीनगर, जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे एसटी बससेवा रद्द करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. जालन्यामध्ये घडलेल्या घटनेचे संपूर्ण राज्यभरात पडसाद सध्या उमटत असल्याचं पहायला मिळत आहे. सोलापुरात देखील सखल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले आहे. राज्यभरात विविध ठिकाणाहून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. त्यामुळे यावर शासन आता कोणती भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी सध्या विरोधकांकडून करण्यात येत आहे.

त्याचबरोबर जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा मोठा फटका मराठवाड्याला बसला आहे. पुण्यावरून एसटीने छत्रपती संभाजीनगरला, जालन्याला निघालेले बरेच प्रवासी अडकून पडल्याचे समोर आले आहे. प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, श्रीरामपूर, बीड या भागातील एसटी बस पुर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर लातूरला जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. दररोज या भागांमध्ये ६०० एसटी बस सोडण्यात येतात. याचा मोठा फटका सामान्य प्रवाशांना बसला आहे. त्यांउळे आता पुण्यातून सुटणाऱ्या बस देखील काही अंशी रद्द केल्या आहेत. जालन्यातील घटनेचा संपूर्ण राज्यभरातून निषेध होत असून राजकीय वर्तुळात देखील या घटनचे पडसाद उमटत आहेत. मनसे (MNS) नेते बाळ नांदगावकर यांनी देखील अंतरवालीमध्ये हजेरी लावली आणि आंदोलकांची भेट घेतली. दरम्यान, यावेळी त्यांनी आंदोलक आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी संवाद घडवला. यावेळी राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांना कोणतीही काळजी करु नका. असं म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी आंदोलनकर्ते जरांगेंशी फोनवरुन संवाद साधला. त्यांनी जखमींची देखील विचारपूस केली. मनसेचे नेते बाळ नांदगावकर हे त्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांनी सुद्धा या आंदोलकांची विचारपूस केली. तसेच, मनसेचा उपषोणकर्त्यांना पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. यावेळी आंदोलनकर्ते जरांगे यांनी त्यांची व्यथा देखील राज ठाकरेंजवळ मांडली आहे.

यावेळी बोलताना आज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, आम्हालाच मारुन आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाच ते सहा वर्षांच्या मुलाला देखील मारण्यात आलं आहे. आम्ही शांततेत आमरण उपोषण करत होतो. यावर आम्हाला काय बोलावं हेच कळत नाही. पण हा असा अन्याय आम्ही निजामाच्या काळात देखील पाहिला नव्हता आणि इंग्रजांच्या काळात देखील पाहिला नव्हता. तर यावेळी आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून देऊ, असं आश्वासन देखील राज ठाकरे यांनी दिलं आहे. बाळ नांदगावकर यांनी या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलो असल्याचं म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, हे आंदोलन कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी नाही तर सामान्य माणसाच्या हक्कासाठी आहे. साहेबांनी त्यांची भूमिका पत्राद्वारे मांडली आहे. त्यामुळे मनसे या आंदोलकांच्या पाठिशी आहे. तर मराठा समाजाने असं कोणतं पाप केलं आहे की, त्यांना आरक्षण दिलं जात नाही, असा सवाल देखील यावेळी बाळ नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनावर अशा प्रकारे लाठीचार्ज करणं, गोळीबार करणं हे कोणत्या कायद्यात बसतं असा प्रश्न बाळ नांदगावकर यांनी विचारला आहे. ज्या पोलिसांनी या लोकांवर लाठीहल्ला केला आहे त्यांना बडतर्फ करण्याची मागणी बाळ नांदगावकर यांनी केली आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरे यांचं पुढचं लक्ष बारामती! लवकरच घेणार…

जालन्यातील घटनेनंतर उद्या औरंगाबाद बंदची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss