spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

Raj Thackeray On Oath Ceremony: नव्या सरकारला शुभेच्छा देताना राज ठाकरे म्हणाले,” सरकार चुकतंय…”

ज्या मान्यवरांना या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहता आले नाही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

आज ५ डिसेंबरला आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. सर्व नामवंत मान्यवरांच्या उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच अनेक राजकीय नेते, क्रीडापट्टू, चित्रपट सृष्टीतील कलाकार आणि अनेक उद्योग क्षेत्रातील नामवंतांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला असून सर्वांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. तसेच ज्या मान्यवरांना या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहता आले नाही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, ” आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.

२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.

पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा !

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss