Saturday, April 20, 2024

Latest Posts

Raj Thackeray यांनी केली बदलापूर, उल्हासनगरची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दिनांक १४ मे रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या २ दिवसांपासून राज ठाकरे हे ठाणे जिल्ह्यात आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दिनांक १४ मे रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या २ दिवसांपासून राज ठाकरे हे ठाणे जिल्ह्यात आहेत. आज त्यांनी अंबरनाथ येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी बदलापूर आणि उल्हासनगरमधील कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी बदलापूर आणि उल्हासनगर शहर कार्यकारिणीच बरखास्त केली.

आज सकाळी राज ठाकरे हे अंबरनाथ दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी कर्नाटक निवडणुकांवर भाष्य केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हे काँग्रेसचं यश असून आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा हा पराभव असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले आहेत की, कर्नाटकाच्या विजयात भारत जोडो यात्रेचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतो. तुमच्या मालकांनी बातम्या दाबल्या तरीही भारत जोडो यात्रेचा प्रभाव दिसतोय. तुम्ही कितीही नाकारलं तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे.

अंबरनाथ नंतर राज ठाकरे यांनी बदलापूर आणि उल्हासनगरमधील कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी बदलापूर आणि उल्हासनगर शहर कार्यकारिणीच बरखास्त केली. तडकाफडकी हा निर्णय घेतल्याने सर्वांना धक्का हा बसला. तर काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. काही लोकांची पक्षात मक्तेदारी झाली होती. आता नवे लोक आल्यावर पक्षाला बळ मिळेल असं मनसैनिक म्हणत होते. पक्षातील गटबाजीमुळे राज ठाकरेंनी कार्यकर्ता मेळाव्यात हा निर्णय घेतला. आपापसातील हेवेदावे, गटबाजी यामुळे कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. आजच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांना बोलायला दिलं. यावेली कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. या तक्रारी प्रचंड होत्या. शिवाय एखाद दोन अपवाद वगळता सर्वच पदाधिकाऱ्यांशी संबंधित होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी ऐकल्यानंतर पक्षातील असंतोष आणि पक्ष न वाढण्याची कारणे राज ठाकरे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बदलापूरची कार्यकारिणी बरखास्त करण्याची तडकाफडकी घोषणा केली.

बदलापूरची शहर कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राज ठाकरे यांनी आमदार राजू पाटील आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पुढील १० दिवसात नवीन कार्यकारिणी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नव्या कार्यकारिणीत कुणाचा समावेश असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

कोकण स्पेशिअल चमचमीत फणसाची भाजी माहीत आहे कशी बनवतात? जाणून घ्या आमच्या स्पेशिअल रेसिपी मधून!

न्यू स्टाईलमध्ये बनवा White Sauce Pasta

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss