राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र उगारले आहे. आज १२ नोव्हेंबर रोजी मुंबईत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे काय म्हणतात याला महाराष्ट्रात किंमत नाही. मोरारजी देसाई यांच्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा आहे. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला फार स्थान आहे, असं वाटत नाही. मोरारजी देसाईनंतर आता राज ठाकरेच असं त्यांना वाटत आहे. मराठी अस्मितेबद्दल त्यांच्या मनात काय आहे ही शंका कायम आमच्या मनात राहील. महाराष्ट्र स्वाभिमानाच्या अस्मितेचा प्रचार उद्धव ठाकरे करत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची लढाई महाराष्ट्र स्वाभिमानासाठी आहे. गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राची लूट चालवली आहे आणि हे महाशय त्यांच्या बाजूने उभे आहेत. आम्हाला मोरारजी देसाई यांची आठवण झाली, हे दुर्दैव आहे. राज ठाकरे महान नेते आहेत मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना त्यांनी भान ठेवावं ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची लढाई महाराष्ट्रावर डल्ला मारणाऱ्या गुजरातच्या व्यापाऱ्यांविरोधात लढत आहेत. विक्रोळीत जर वारंवार राज ठाकरे यांना सभा घ्यावी लागत असेल तर त्यांचा पक्ष इथे कमजोर असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
विक्रोळीत सुनील राऊतच येणार आहेत. राज ठाकरे यांनी इथे घर घेऊन राहायला पाहिजे. काही नाही त्यांनी कांजूरमार्ग आणि विक्रोळी डम्पिंग ग्राउंडच्या आजूबाजूला जागा रिकामी आहे तिथे घर घेऊन राहावं. कोणत्या पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. दादर, माहीम, प्रभादेवी येथे शिवसेनेचा जन्म झालेला आहे. आम्हाला जन्मस्थान कोणाला देता येणार नाही. ७७ अ,रानडे रोड हा शिवसेनेचा पत्ता होता. त्यामुळे तिथे शिवसेनेचा जन्म झाला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
हे ही वाचा:
IANS Matrize Survey: मोठी बातमी! महानिवडणुकीचा सर्वे आला समोर… महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली