spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

निवडणूक लढवायची असेल तर लढवा, पाडायचं असेल तर पाडा पण… मराठा आरक्षणावरून Raj Thackeray यांचा Manoj Jarange Patil यांना सवाल

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा आज (बुधवार, ६ नोव्हेंबर) लातूर येथे पार पडली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मोठे भाष्य केले आहे. राज्यातील राजकीय पक्षांवर निशाणा साधत राज ठाकरेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात जेव्हा मोर्चा मुंबईत आला होता, तेव्हा व्यासपीठावर शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बसले होते. यावेळी चारही पक्षांनी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं. मग आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? असा सवालदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊन इतरांचे उमेदवार पडण्याच्या भूमिकेवर देखील राज ठाकरेंनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यावेळी म्हणाले, “मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे उपोषणाला बसले. त्यानंतर ते म्हणाले विधानसभेच्या निवडणुका लढवणार… मग काही दिवसांनी सांगितले कि निवडणूक लढवणार नाही. पाडापाडी करणार. तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर लढवा, पाडायचं असेल तर पाडा… पण प्रश्न इतकाच आहे कि हे आरक्षण तुम्ही कसे देणार? एवढं फक्त तुम्ही मला सांगा,” असा सवाल राज ठाकरे यांनी जरांगेना विचारला.

ते म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांना मी भेटायला गेलो होतो. त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगितली होती. आरक्षणाचा विषय हा महाराष्ट्र राज्यापुरता नसून देशभराचा विषय आहे. प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या जातीचे प्रश्न पुढे येतील… हे होणार नाही… आरक्षण देणाऱ्यांना विचारा कसे देणार? ते देऊ शकत नाहीत. कोणतेही राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही. जी गोष्ट घडू शकत नाही, भेटू शकत नाही त्यासाठी आपण एकमेकांमध्ये भांडत आहोत,” असे ते म्हणाले.

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच आता राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्या करू लागले आहेत. अश्यातच मनसेसुद्धा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून मनसेप्रमुख राज ठाकरे राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे.

हे ही वाचा:

Devendra Fadnavis यांचे Rahul Gandhi यांच्यावर टीकास्त्र; म्हणाले,”मग लाल संविधान कशासाठी?”

अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss