राज्यात विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) मतदानाची तारीख जशी जवळ येतेय तसा घडामोडींचा वेगही वाढत जातोय. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अशातच आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही सध्या जोरदार तयारीला लागले आहेत. मनसेने संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेसाठी उमेदवार घोषित केले आहेत. त्यातच आता लातूरमध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, बेरोजगारीसारख्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांवर टीकास्त्र केलं.
मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्या भाषणातून नेहमी ‘एकदा हातात सत्ता द्या’ असे वारंवार महाराष्ट्राला साद घालत असतात. आताही विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे लातूरमध्ये आले. लातूरच्या रेणापूरमध्ये घेतलेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला साद घातली. महाराष्ट्राला माझं सांगणं आहे की, “या राज ठाकरेंच्या हातात सत्ता देऊन बघा. मी विनाकारण बोलत नाही. मी सत्ता न पाहिलेला माणूस नाहीये. मी सत्ता पाहिली आहे. मला कोणत्याही खुर्चीची अभिलाषा नाहीये. मी तुम्हाला सांगतो राज्यातील एकही तरुण आणि तरुणी हाताला कामाविना राहणार नाही. मी खरंच सांगतो हे खरंच सत्य आहे. माझ्या पक्षाचा जाहीरनामा येत आहे. त्यातही मी याचा उल्लेख केला आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात काही महत्वाच्या गोष्टी टाकल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची म्हणजे प्रत्येक मराठी मुलींना आणि मुलांना १०० टक्के रोजगार या महाराष्ट्रातच मिळेल. खाजगी कंपन्यात आरक्षण नाही. ते आरक्षण देत नाही मी आता शब्द देतो. या खाजगी कंपन्यातही आरक्षणाविना राज्यातील मराठी मुला मुलींना नोकऱ्या मिळतील. उद्योगधंदा करायचा असेल तर मला ते चालणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. आपण महाराष्ट्रातील आहोत. मराठी आहोत. पण आपण एकमेकांकडे जातीने पाहत आहोत. हिणवत आहोत. एकमेकांच्या दुकानात जात नाही असं चित्र मराठवाड्यात कधी नव्हतं. राज्यातील कोणत्याही तरुणाला नोकरी आणि शिक्षण हे मिळालंच पाहिजे. हाताला काम मिळालं पाहिजे. या जातीचा आहे म्हणून मिळावं आणि त्या जातीचा म्हणून मिळू नये ही कोणती बुद्धी? असे राज ठाकरे यांनी भाष्य केले.
हे ही वाचा:
Sharad Pawar राजकारणातील महामेरू, भीष्म पितामह: Sanjay Raut