Wednesday, June 7, 2023

Latest Posts

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा खेडमध्ये (Raj Thackeray in Khed) जाहीर सभा पार पडली.

Raj Thackeray In Ratnagiri : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा खेडमध्ये (Raj Thackeray in Khed) जाहीर सभा पार पडली. यसभेमध्ये राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे हे मांडले आहेत. तर यावेळी बोलत असताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे.

यावेळी बोलत असतानान राज ठाकरे म्हणाले आहेत की, “२०१४ च्या आधी तेव्हाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार अशी घोषणा केली. मी त्यावर काय बोललो, हे लक्षात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आवई उठवली की म्हणे राज ठाकरेंचा ह्या पुतळ्याला विरोध आहे. मी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेन असं वाटतं तुम्हाला? बरं हे बोलणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष शरद पवार हे महाराजांचे नाव घेत नाहीत आणि हे मला बदनाम करणार”.

“इथल्या लोकप्रतिनधींना तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही, हे विसरू नका. कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की आपले शत्रू समुद्रमार्गाने येतील. त्यामुळे समुद्रावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवा. पण आपण दुर्लक्ष केलं. २६/११ चा अतिरेकी हल्ला करणारे अतिरेकी समुद्र मार्गाने आले. १९९२ च्या बॉम्बस्फोटात वापरलेलं आरडीएक्स पण समुद्र मार्गाने आलं होतं. पण आपण महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलंय आपण”, असेही राज ठाकरेंनी म्हटलं. तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले आहेत की, माझा मुद्दा इतकाच होता की महाराजांच्या समुद्रातील पुतळ्यावर १० हजार कोटी रुपये खर्च करणार त्यापेक्षा महाराजांनी उभे केलेले गडकिल्ले हे महाराजांचं खरं स्मारक आहे, त्यांचं आधी संवर्धन करा हे माझं म्हणणं होतं. पण माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला. कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, इतकं वैविध्य असलेलं कोकण. इथे पर्यटनाला चालना दिली तर राज्याचं अर्थकारण कोकण चालवेल. पण कोणाला काहीच घेणंदेणं नाही.

हे ही वाचा : 

दोहा डायमंड लीग जिंकून नीरज चोप्रा जागतिक आघाडीवर

राजीनाम्याच्या निर्णयावरून शिवसेनेच्या आमदाराचा टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss