Thursday, April 25, 2024

Latest Posts

कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठी बांधवानी एकजुटीने मतदान करा, राज ठाकरेचे आवाहन

आज राज ठाकरे यांनी नुकतच कर्नाटक विधासभेच्या संदर्भामध्ये एक ट्विट केले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या १० मे मतदान होणार आहे.

आज राज ठाकरे यांनी नुकतच कर्नाटक विधासभेच्या संदर्भामध्ये एक ट्विट केले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या १० मे मतदान होणार आहे. त्या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी मराठी बांधवाना आवाहन केले आहे की, सीमाभागातील माझ्या मराठी बंधू भगिनींनी सर्वानी एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कोणत्याही पक्ष असला तरी तो मराठी असायला हवा आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गाळपेची मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय या विरोधामध्ये तेथील विधानसभेमध्ये वाचा फोडायला हवे असे त्या ट्विट मध्ये राज ठाकरे यांनी लिहिले आहे.

पुढे लिहिले आहे की,, तुम्ही ज्या राज्याचे आहात त्या राज्याची भाषा, तेथील संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागांमध्ये कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. परंतु तरी सुद्धा तेथील सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल तर मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयंत्न करणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असे राज ठाकरे यांनी ट्विट राज ठाकरे यांनी लिहिले आहे. पुढे त्यांनी लिहिले आहे की, मध्यंतरी जेव्हा पुन्हा एकदा सीमावादाला कर्नाटक सरकार कडूंखतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात होता तेव्हा मी म्हणालो होतो की, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये मुळामध्ये एकजिनसीपणा आहे असे त्यांनी ट्विट मध्ये सांगितले आहे.

पुढे त्या ट्विट मध्ये राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, अनेकांची कुलदैवत हे कर्नाटकमध्ये आहेत. त्याचप्रमाणे अनेक कन्नडिगांची कुलदैवत महाराष्ट्रामध्ये आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर दोन राज्यांमधील बंध मजबूत आहे. तेव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार आहे. पण कोणत्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यामध्ये किंचितही गरक नाही. म्हणूनच इथल्या विधानसभेमध्ये मराठी भाषिक आमदार जो त्या भागामधील मराठी अस्तित्व प्रतिनिधित्व मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोक असायला हवीत.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss