spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचा मोठा हल्लाबोल, महाराष्ट्रातील जातीचे राजकारण ही शरद पवारांची देणगी

मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे.

Raj Thackeray on Sharad Pawar : मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अश्यातच आता राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल हा केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात जातीच्या राजकारणामागे शरद पवार आहेत. एवढेच नाही तर राजकीय फायद्यासाठी शरद पवार १९९९ पासून महाराष्ट्रात जातीचे राजकारण वाढवत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे १० दिवस उरले आहेत . दरम्यान, पुण्यातील सभेला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, जातीवादी राजकारणाच्या नव्या आवृत्तीत मराठा आता ओबीसींच्या (इतर मागासवर्गीय) विरोधात उभे ठाकले आहेत. ते म्हणाले, “”शरद पवार यांनी महाराष्ट्रात जातीचे राजकारण सुरू केले. राजकीय फायद्यासाठी समाजात द्वेष पसरवला गेला. प्रथम ब्राह्मण आणि मराठा समाजात जातीय तेढ निर्माण झाली. आता मराठा समाज आणि ओबीसींमध्ये जातीयवाद वाढवला जात आहे. ‘जातीवादाचे विष विरघळण्याचे काम शरद पवारांनी केले’, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले आहे. महाराष्ट्राला थोर नेत्यांचा आणि संतांचा वारसा लाभला आहे, पण सध्याच्या काळात जातीवादाचे विष विरघळविण्याचे काम करणारे संत आहेत. ते संत दुसरे कोणी नसून शरद पवार आहेत. एवढेच नाही तर जातीपातीत न अडकता विचारपूर्वक मतदान करा, हे महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे राज ठाकरे यांनी जनतेला सांगितले.

लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख करताना मनसे प्रमुख म्हणाले की, लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केली असून, त्याचा काही महिलांना फायदा झाला आहे. मात्र, अजूनही काही महिला या योजनेपासून वंचित आहेत. महिलांना फुकटात काहीही न देता त्यांना काम देऊन बळकट करण्यावर भर दिला पाहिजे.

हे ही वाचा:

मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची कवितेतून जोरदार फटकेबाजी, पंतप्रधान आहे पळणारा चित्ता…

PM Narendra Modi LIVE: शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की… अकोल्यातून पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss