Friday, April 19, 2024

Latest Posts

“The Kerala Story” चित्रपटावर Raj Thackeray चं मोठं विधान

अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) यांचा नवा कार्यक्रम खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचा नुकताच नवा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि या कर्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) यांचा नवा कार्यक्रम खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचा नुकताच नवा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि या कर्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याआधी या कार्यक्रमाचे आधी सुद्धा सिझन झाले आहेत आता नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सीझनमध्ये पहिल्याच एपिसोडमध्ये राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. राज ठाकरे यांनी अवधूत गुप्तेंच्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली आहेत. अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या स्पष्ट प्रश्नाची राज ठाकरे यांनी रोकठोक उत्तरे दिली आहेत.

सध्या चर्चेत असलेला चित्रपट “द केरला स्टोरी” या चित्रपटावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. चित्रपटावर बंदी असणे योग्य की अयोग्य? यावर राज ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले. द केरला स्टोरी चित्रपटावर राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला त्यावर राज ठाकरे म्हणाले की, जर सेन्सॉरने चित्रपटाला प्रमाणपत्र दिले असेल तर विरोध करणारा मी कोण अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी केली आहे. “द केरला स्टोरी” चित्रपट जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा चित्रपट रिलीज आधीपासूनच देशभरामध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकलेला होता. त्यामुळे पडसाद जगभरामध्ये उमटलेले आपण पहिले.

 

“द केरला स्टोरी” चित्रपट वादाच्या भोवऱ्यात असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तगडी कमाई सुद्धा केली आहे. २०-२५ कोटीच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला आतापर्यत जमवलेला आहे. अवधूत गुप्ते यांचा हा नवा कार्यक्रम ४ जून पासून सुरु होणार आहे आणि हा कार्यक्रम रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss