Thursday, April 25, 2024

Latest Posts

Karnataka च्या निकालानंतर Raj Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया, भारत जोडो यात्रेचा…

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता ही सर्वांना लागली होती. संपूर्ण देशाचं लक्ष हे कर्नाटकच्या निकालाकडे लागले होते.

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता ही सर्वांना लागली होती. संपूर्ण देशाचं लक्ष हे कर्नाटकच्या निकालाकडे लागले होते. या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव हा झला आहे. पहिल्या अर्ध्या तासातच कर्नाटकाचे चित्र हे स्पष्ट झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे आज राज ठाकरे हे अंबरनाथच्या दौऱ्यावर आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हे काँग्रेसचं यश असून आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा हा पराभव असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले आहेत की, मागे एकदा मी माझ्या भाषणात म्हटलं होतं की विरोधी पक्ष कधी जिंकत नाही. सत्ताधारी हरत असतात. हा स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करु शकतो? अशा प्रवृत्तीचा पराभव आहे. जनतेला कधीही गृहित धरू नका हा त्यातील बोध आहे. सर्वांनीच त्यातून बोध घ्यावा, असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला नाव न घेता लगावला.

तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले आहेत की, कर्नाटकाच्या विजयात भारत जोडो यात्रेचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतो. तुमच्या मालकांनी बातम्या दाबल्या तरीही भारत जोडो यात्रेचा प्रभाव दिसतोय. तुम्ही कितीही नाकारलं तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे. मात्र पुढे हा प्रभाव राहील की नाही माहीत नाही. ते सांगायला मी काही ज्योतिषी आहे काय? असा सवाल त्यांनी केला. पहाटेचा शपथविधीवर देखील राज ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. उगाच कुणाला धडे शिकवू नका. तुम्ही या गोष्टी केल्या. त्यानंतर महाराष्ट्राचं हे राजकारण झालं. उगाच सारवा सारवी करू नका, अशा शब्दात राज यांनी मुनगंटीवार यांना फटकारलं.

 

कर्नाटकाच्या निकालाने महाराष्ट्रात बदलाचे संकेत आहेत असं वाटतं का? त्यावर राज ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं नाही. आता काय सांगू शकणार? आता कर्नाटकाचा निकाल लागला आहे. पुढे काय आणि कसं कसं घडतं हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या निकालावरून आताच महाराष्ट्राबाबत भाष्य करता येणार नाही, असं राज यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

भाजपा हा पराभव सहन करणार नाही,काहीतरी कुरखुड्या भाजप गोट्यातून सुरूच राहतील – पृथ्वीराज चव्हाण

Karnataka Assembly election 2023, ‘या’ पक्षांना मिळाली NOTA पेक्षाही कमी मतं

Karnataka Assembly election 2023 Result, कर्नाटकात सत्तापालट, काँग्रेसचा दणदणीत विजय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss