Friday, April 19, 2024

Latest Posts

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्टातील सत्ता संघर्षावर काल निर्णय झाला. हा निर्णय ७ खंडपीठाकडून जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर काळाचा निकाल हा शिंदे सरकारच्या बाजूने लागला आणि ठाकरे गटाला अशरणागती पत्कराव्वी लागली.

महाराष्टातील सत्ता संघर्षावर काल निर्णय झाला. हा निर्णय ७ खंडपीठाकडून जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर काळाचा निकाल हा शिंदे सरकारच्या बाजूने लागला आणि ठाकरे गटाला अशरणागती पत्कराव्वी लागली. मात्र असे असले तरी हा महाराष्ट्रातील सत्तांतराच्या निर्णयावर वेगवेगळ्या प्रकारे युक्तिवाद देखील करण्यात आला. न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सविस्तर निकाल दिल्यानंतर त्यावरून राज्यात अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिल्यानंतर त्यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा असल्याचं मत राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलं. राज ठाकरे यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलत असताना असं वक्तव्य केले.

राज ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याप्रकरणी मला न्यायालय किंवा पोलिसांकडून नोटीस येतात. त्यातील त्यांची भाषा वाचल्यावर आपल्याला सोडलंय की अटक केली हेच कळत नाही. इतकी ती भाषा गुंतागुंतीची असते.चिन्ह त्यांनी सांगितलं सगळी प्रक्रिया चुकली, मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधिमंडळातील गट पक्ष समजला जाणार नाही, बाहेरचाच पक्ष म्हणून समजला जाईल. ही गोष्ट झाल्यावर निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं काय होणार?” असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

या सगळ्यात निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे, सर्वोच्च न्यायालय ही एक यंत्रणा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता निवडणूक आयोग काय करणार? म्हणून मी हा निकाल प्रचंड गोंधळात टाकणारा आहे, असं म्हटलं. त्यामुळे ही सगळी धूळ खाली बसल्यावर आपल्या सर्वांना नक्की काय झालंय हे कळेल,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं. तर सध्या राज्यात ज्या प्रमाणे राजकारण चालू आहे जो काही खुर्चीसाठी खेळ चालू आहे हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. असा देशील राज ठाकरे यांनी संगीत आहे. त्यांच्याबरोबर त्यांनी घेतलेल्या रत्नागिरी इथल्या सभेत देखील राज ठाकरे यांनी जनतेला केंद्र स्थानी ठेवून राजकारणात सध्या खुर्चीला माहात्व्हा दिले जात असून लोकनाच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे हे दाखवून दिले.

हे ही वाचा : 

सुप्रीम कोर्टाचा निर्णय येताच मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु, बच्चू कडूंनी दिली माहिती

मलबार हिल येथील पार्किंगची समस्या सोडवण्यास दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

 

Latest Posts

Don't Miss