राज्यात विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) मतदानाची तारीख जशी जवळ येतेय तसा घडामोडींचा वेगही वाढत जातोय. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अशातच आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही सध्या जोरदार तयारीला लागले आहेत. मनसेने संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेसाठी उमेदवार घोषित केले आहेत. त्यातच आता लातूरमध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांवर टीकास्त्र केलं.
लातूरमधील जाहीर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उठवला. त्यात ते म्हणाले की, “मराठा समाजाचा पहिला मोर्चा मुंबईत आला होता. त्याच मोर्चाला सामोरे कोण कोण गेले होते. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोकं होती. विधिमंडळ अधिवेशन सुरु होतं. सर्वानी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सांगितलं. मग अडवलं कोणी होतं. मग आतापर्यंत का नाही दिले. कधी यांची तर कधी त्यांची सत्ता आली. या गोष्टीला २० वर्षे झाली. इतक्या वर्षात फक्त तुम्हाला झुलवत ठेवलं. राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात मराठा समाजाचे मोर्चे निघाले. इतके शिस्तबद्ध मोर्चे मी इतिहासात पाहिले नाही. कोणी पुढारी नव्हता. पण सर्व जिल्ह्यातून मोर्चे शिस्तबद्ध निघाले. त्या मोर्चाचं काय झालं. का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळालं”, असा राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत सवाल उपस्थित केला.
राज ठाकरे या सभेत मनोज जरांगे विषयी म्हणाले की, मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात निवडणूक लढवू, नंतर म्हणतात नाही लढणार, पाडणार. तुम्हाला लढायचे लढा नाही तर नका लढू. प्रश्न एवढाच आहे की, आरक्षण कसं देणार ते सांगा. हे फक्त तुम्हाला झुलवत आहेत. राजकीय पक्ष फक्त भूलथापा देत आहेत. कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही. मी फक्त सत्य परिस्थिती मांडतो. असे राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
लातूरच्या सभेमध्ये Raj Thackeray यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर साधला निशाणा
महाराष्ट्राचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासारखा… Sadabhau Khot यांचा Sharad Pawar यांच्यावर खोचक टीका
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.