spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

Raj Thackeary यांनी केला हल्लाबोल, उद्धव ठाकरेंच्या हातून कधी पैसा सुटत नाही…

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. राज्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत.

अश्यातच माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या यांची विमानतळावर बॅगेची तपासणी करण्यात आली. दोन दिवसा दिवसांपूर्वी वाणी येथेही असाच प्रकार झाला होता. या घडलेल्या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः याचा व्हिडिओ करत कर्मचाऱ्यांची उलट तपासणी केली. तो व्हिडिओ उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावर टाकला आहे. उद्धव ठाकरें यांची लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा होती. या सभेत देखील त्याची बॅग तपासणी झाली असून त्यांनी जोरदार टीका केली. माझी बॅग तपासा… पण पंतप्रधान नरेंद्र मोंदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची बॅग का तपासत नाही? जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी असा प्रश्न विचारला. माणसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या या बॅग तपासणीवर भाष्य केले आहे. भांडुपच्या जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते.

ज्यांच्या हातातून कधी पैसे निघाले नाहीत, सभे दरम्यान राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या निवडणूकीच्या आयोग्याच्या लोकांनी बॅग तपासली. परवा सुद्धा असं झालं होत. निवडणूक कर्मचाऱ्यांना कळत नाही त्यात काय भेटणार. ज्यांच्या हातून कधी पैसे निघाले नाही त्यांच्या हातून आजून काय निघणार. राज ठाकरेंनी निशाणा साधत म्हंटल आहे की फारफार तर रुमाल आणि कोमट पाणी… असा टोला उद्धव ठाकरेंना लावला. आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली, अरे… आमची पण बॅग तपासली आहेत. अरे एवढा मोठा काय तमाशा करताय, अशी राज ठाकरेंनी टीका केली आहे.

शिंदे गटातील संजय शिरसाट काय म्हणाले?
निवडणूक आचारसंहिता असते त्यानुसार, जो अधिकार पथकाला असतो, आणि तो त्यांनी वापरला आहे. या घटनेला मानणाऱ्या लोकांनी त्रास करून घेऊ नये. मात्र तुमच्याकडे काही नाही ना, तुमच्यावर पाच मिनिटांनी काय आभाळ कोसळणार आहे… आपण काय काही विशेष आहे का? उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील बॅग चेक केली पाहिजे असं आमचं मत आहे. हा एक छोटा विषय आहे. एक बॅग चेक केली… हा काय विषय आहे का? संजय शिरसाट यांनी अशी टीका केली आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या महानायकाच्या गाथेचा भव्य ट्रेलर प्रदर्शित

NCP नेते नजीब मुल्ला फेस टू फेस Time Maharashtra वर । Najib Mulla

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss