आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या पुण्यातील पाच नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार तर ठाकरे यांचे कोकणातील विश्वासू मानले जाणारे नेते राजन साळवी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ” शिंदे कोणाच्या वाटेवर आहेत हे तुम्ही पहिलं पहा, शिंदेंची लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहे. ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे त्यामुळे शिंदे स्वतः अस्थिर आणि अस्वस्थ आहेत. अशा अस्थिर पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का ? अनेक अमिश दाखविली जात आहेत. सत्तेचा धाक दाखविला जात आहेत ते कमजोर हृदयाचे आहेत. अजूनही शिवसेनेमध्ये खंबीर नेते काम करत आहेत. नवीन कार्यकर्ते नेते तयार करायचा कारखाना शिवसेनेमध्ये आहे. मात्र भाजपने आणि इतर पक्षांनी ते घ्यायचे हा गेल्या 50 वर्षाचा ठेका आहे. याचा अर्थ बस रिकामी होत नाही. पुढच्या दारातून उतरले तर मागच्या दारातून लोक परत चढतात आमची बस भरलेली आहे.
पुढे ते म्हणाले, “राजन साळवी यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. पराभवानंतर ते अस्वस्थ आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे आमचे पराभव झालेले आहेत त्याची कारण आम्ही शोधतो आणि कारणे माहीत देखील आहेत. ज्यांना असं वाटतं आम्ही पक्ष सोडल्यामुळे याची आयुष्य भरभरून येईल, राजकीय जीवनात एखादा पराभव वाट्याला येतो तो पचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्यांनी स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक मानू नये. आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आलेला आहे. माणुसकी नाही, नीतिमत्ता नाही. राजन साळवी एक कडवट शिवसैनिक आहेत, आमदार राहिले आहेत. त्यांच्याशी बोलणं झालेल आहे, त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. स्थानिक पातळीवरती ठाकरे देखील बोलले आहेत त्यांच्याशी हे दिवसही जातील २०२६ पर्यंत केंद्रामध्ये सरकार राहील की नाही ही शंका माझ्या मनात काय आहे. मोदी त्यांचे टर्म पूर्ण करणार नाही. त्यानंतर अनेक ठिकाणी उलटा पालट होईल.”
हे ही वाचा:
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर करणार का ?
भारतीय क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! सिडनी कसोटीपूर्वी गोलंदाज जखमी तर संघात कोणाला मिळणार जागा ?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.