राजापूरचे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना ठाकरे गटाला निरोप देण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला वगळले तर कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याने राजन साळवी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. कुटुंबियांच्या मागे एसीबीचा जाळा पुन्हा आल्यास, त्यावर राजन साळवी यांना चिंता आहे. त्यामुळे राजन साळवी महिन्याभरात याबाबत निर्णय घेणार आहेत. राजन साळवी शिंदेंची शिवसेना की भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली आहे.
राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून राजन साळवी आणि शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. किरण सामंत यांनी बहुमताने राजापुरात विजय मिळवला आहे. तर राजन साळवी यांचा पराभव झाला आहे. चौथ्यांदा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र ते २०२४ च्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका