spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

राजन साळवींचा ठाकरे गटाचा राम-राम… खासदार विनायक राऊतांनी लगावला टोला

ठाकरे गटाचे राजन साळवी हे ठाकरे गटाला राम राम करून गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. यावर माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाढलेली जवळीक पाहता त्यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राजन साळवींना सोबत घेतल्याचं ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत म्हणाले. शिंदे गटाकडून राजन साळवी यांचा वापर करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

विनायक राऊत म्हणाले की, राजन साळवी यांची कीव करावी वाटते. विधानसभेच्या पराभवानंतर राजन साळवे यांनी 100 बैठका घेतल्या आणि भाजपमध्ये जाणार असल्याचं त्यामध्ये सांगितलं. देवेंद्र फडणवीस आपल्याला विधान परिषद देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नंतर भाजपने त्यांच्यासाठी कायमची दारं बंद केली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भेट दिली नाही.

ज्या सामंत कुटुंबाच्या विरोधात तथाकथित आरोळी फोडत होते त्यांचं पालकत्व राजन साळवी यांना स्वीकारावं लागणार आहे. हा त्यांच्यावर नियतीने उगवलेला सूड आहे असा टोला विनायक राऊत यांनी लगावला.

पुढे ते बोलले, गेली 35 वर्षे शिवसेनेत राजन साळवी काम करत असताना त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं होतं.एखाद्याला बेइमानी आणि गद्दारी करायची झाली तर कोणावर तरी त्याला खापर फोडावं लागणार आणि ते खापर माझ्यावर फोडलं. राजन साळवी यांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून कसे पैसे घेतले हे निलेश राणे यांनी एका वर्षांपूर्वी जाहीरपणे सांगितलं होतं. राजन साळवी यांच्या निष्ठेचा बुरखा त्याच वेळी फाटला असं म्हणत विनायक राऊत यांनी राजन साळवी यांच्यावर टीका केली.

राजन साळवींचा राजीनामा
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजन साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षसंघटना बांधणीच्या अनुषंगाने उपनेतेपदाच्या कार्याला योग्य न्याय देऊ शकत नस्ल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली. राजन साळवी आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

हे ही वाचा:

संस्कृती, प्रेम, शांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन, सद्भावना निर्माण करण्याचे ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय

GBS Update : ‘जीबीएस’ चा शिरकाव! पुण्यात आणखी एकाच बळी; २१ जण व्हेंटिलेटरवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss