Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अमरावतीमधील तिवसा मतदारसंघातदेखील काँग्रेसच्या बलाढ्य तीन टर्म आमदार यशोमती ठाकूर यांना पराभव पत्करावा लागला आहे. यावरून, आता विजयी उमेदवार भाजपच्या राजेश वानखेडे यांनी मोठे भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.
राजेश वानखेडे यांनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “यशोमती ठाकूर यांनी मतदार संघामध्ये केलेल्या पैशाच्या चिखलात कमल फुललं आहे. मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या दुष्टीने गावातील पांदन रस्ते, नाले, पाणी यावर विशेष काम झालेलं नाही. यशोमती ठाकूर यांनी जे आराखडे म्हणून काम केले ते सांगतात, असे कोणतेही आराखडे नाहीत. सर्वसामान्य जनतेचा रोष होता म्हणून यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला.”
ते पुढे म्हणाले, “तिवसा मदतरसंघात १५ वर्ष आमदार असताना पाणी पुरवठा करू शकल्या नाहीत. यशोमती ठाकूर यांनी एमआयडीसीमध्ये कोणताही उद्योग आणलेला नाही, देवेंद्र फडवणीस यांनी उद्योग आणले आणि यशोमती ठाकूर यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केले. तरुणांसाठी काही केलेलं नाही, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एखादे सेंटर तरी उघडायचे. यशोमती ठाकूर यांनी आराखड्यात बांधलेली एक ही गोष्ट कामाची नाही,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.
यशोमती ठाकूरांच्या बालेकिल्यातच त्यांचा पराभव
अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महिला व बाल कल्याण मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांना पराभव पत्करावा लागला आहे. भाजपच्या राजेश वानखेडे यांनी त्यांना पराभूत केले आहे. यशोमती ठाकूर यांचा सुमारे ७ हजार ६१७ मतांनी पराभव झाला असून त्यांना ८८ हजार ५०१ मते पडली आहेत. तर, राजेश वानखेडे यांनी ९१ हजार ७०२ मतांसह विजय मिळवला. सलग तीन वेळा निवडून येऊन यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातून विजयाची हॅट्ट्रिक साधली होती. परंतु, चौथ्यांदा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”