Raju Patil: कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ६५ बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर या मुद्द्यावरुन राजकारण चांगलाच तापलंय. मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर बेकायदेशीर बांधकामाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. राजू पाटील म्हणाले की, बेकायदेशीर बांधकाम माफिया, कागदपत्रे बनावट करणारे आणि लोकांची फसवणूक करणाऱ्यांना ठाण्यातून आश्रय देण्यात आला आहे.
मनसेचे नेते राजू पाटील यांनी अनधिकृत बांधकामांचा म्होरक्या ठाण्यात राहतो, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केला आहे. पालिका अधिकारी, रजिस्ट्रेशन ऑफिसचे, बँकांचे अधिकारी यात समील आहेत. सर्च रिपोर्ट असल्याशिवाय हे करु शकत नाही. आर्थिक हितसंबंध जोपासताना त्यांना अभय देण्याचे काम इथला लोकल कोणी करु शकत नाहीत. ते ठाणेवाले करतात, असा माझा स्पष्ट आरोप असल्याचे मनसेने नेते राजू पाटील यांनी सांगितले. शिंदे पिता – पुत्रांचे नाव न घेता मनसे नेते पाटील यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
पाटील यांनी सांगितले की, एखाद्या सेलिब्रेटीवर काही प्रसंग आला, तर त्याला भेटायला जायलाच पाहिजे. पण कल्याण – डोंबिवलीतील लोक मरताहेत. दिव्याला काही लोक रॉकेल घेऊन बसले आहेत, पालकमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी इथे येऊन लोकांना भेटायला पाहिजे. एकनाथ शिंदे सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात उपस्तिथ राहिले आहेत. त्यामुळे गंगेत डुबकी मारुन पाप घुतले जाते. इथे पुण्य जास्त मिळेल, इथे पालकमंत्री आहेत. नगरविकास खाते त्यांचे आहे. त्यांचा मुलगा खासदार आहे, अशा शब्दांत त्यांनी नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याचं म्हणत उपमुख्यमंत्र्यांना राजू पाटील यांनी टोला लगावला.
दीपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) सहा महिन्यापूर्वी उबाठा गटात आले. चांगले काम करत आहेत. मला पण त्यांचा फोन होता. माझी त्यांना विनंती आहे ते पुन्हा घरवापसी करणार नसतील, तर त्यांच्या मागे मी उभा राहणार. पोलीस या प्रकरणात सामिल असून त्यांच्यावर दबाव आहे. वॉर्ड अधिकारी मोठा जबाबदार आहे. ही मोठी चैन आहे. ठाण्यातील यांचा आका निर्णय घेत नाही. आता तरी बस करू असा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे, असंही राजू पाटील म्हणाले.
सगळे लोक शिंदे गटात नव्हते. त्यांना धमक्या देऊन पक्षात घेतले. विधानसभा निवडणुकीत त्यांना असे वापरले, हीच सवय लावणार असा आरोप पाटील यांनी केला. तुमच्या इमारती तोडणार, तुमच्या रहिवासीयांना पैसे वाटून मतदान करायला सांगा, मतदान झाले नाही, तर इमारती तोडण्याची धमकी दिली.असा जोरदार घणाघात राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केला आहे.
हे ही वाचा: