spot_img
Sunday, January 12, 2025

Latest Posts

राम शिंदे यांना देण्यात आली मोठी जबादारी……

भाजप नेते राम शिंदे यांना एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महायुतीची सरकार स्थापन झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे विराजमान झाले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. आता भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांना एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

महायुतीत सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा भाजपच्या गळ्यात पडली. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतिपदी सभापतिपदी कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या सभापति पदासाठी इच्छुक होत्या. मात्र परिषदेतील संख्याबळामुळे भाजपने स्वतःकडे सभापतिपद ठेवत शिवसेनेला धक्का दिला आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपमधून राम शिंदे आणि प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र भाजपकडून राम शिंदे यांना संधी देण्यात आली. विधानपरिषदेचे सभापतीपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते.

राम शिंदेंनी पदभार स्वीकारला
राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी कारभार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी राम शिंदेंना शुभेच्छा दिल्या. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी भाषण केले.

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाचे मानले आभार
“मी राम शिंदे यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. या सभागृहाने एकमताने राम शिंदे यांची सभागृहाच्या सभापतीपदी निवड केली, त्याबद्दल मी सभागृहाचेही आभार मानतो. सभापतीपदाची निवड ही निवडणूक पद्धतीने होत असली तरी एकमताने सभापतीची निवड करावी, या परंपरेला साजेसा निर्णय विरोधी पक्षाने घेतला. त्याबद्दल मी विरोध पक्षाचे अतिशय मनापासून आभार मानतो. प्राध्यापक राम शिंदे हे जे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चित सवय आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही अतिशय शिस्तीने आणि संवेदनशीलतेने या सभागृहाचा कारभार चालवाल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विधानपरिषदेचे सभापतीपदासाठी फक्त राम शिंदे यांचा अर्ज दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ७ जुलै २०२२ पासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. राम शिंदे यांनी काल विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. या पदासाठी अर्ज करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. तर सभापतीपदासाठी १९ डिसेंबर रोजी निवडणूक होईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, विधानपरिषदेचे सभापतीपदासाठी फक्त राम शिंदे यांचा अर्ज दाखल झाला होता. यामुळे भाजप नेते राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

हे ही वाचा:

छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी समाज का? Suhas Kande यांचा भुजबळांवर हल्लाबोल

अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या कथित विधानानंतर संसद दणाणली; विरोधक आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss