Tuesday, June 6, 2023

Latest Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर राऊतांची खोचक टीका

मणिपूरमध्ये (Manipur) मैतेई समुदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या निर्णयावरून हा हिंसाचार उसळला आहे आतापर्यंत या घटनेमध्ये ६० जणांचा मृत्यू तर १७०० घरे जाळून त्यांची राख झाली आहेत.

मणिपूरमध्ये (Manipur) मैतेई समुदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या निर्णयावरून हा हिंसाचार उसळला आहे आतापर्यंत या घटनेमध्ये ६० जणांचा मृत्यू तर १७०० घरे जाळून त्यांची राख झाली आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खोचक टीका केली आहे. आज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कर्नाटक निवडणुकीच्या संदर्भामध्ये बोलताना भाजपाला लक्ष केलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून संपूर्ण मंत्रिमंडळ, देशभरातील राज्याराज्यातील भाजपा नेते, राज्यांचे मुख्यमंत्री यांनी कर्नाटकामध्ये तहान मांडून बसले आहेत. कर्नाटक निवडणुकींमध्ये पैशांचा महापूर आला आहे. या निवडणुकीला अगदी बजरंग बलीला निवडले आहे. हनुमान चालिसा, वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला सांगतो, यांना कोणताही देव पावणार नाही. बजरंग बलीच त्यांना गदाने मारणार आहे असे संजय राऊत म्हणाले.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजेच १३ तारखेला पाहा हनुमानाची गदा यांच्यावर पडणार आहे. तिकडे मणिपूरला काय चाललंय, जम्मूमध्ये पाच सैनिक मारले गेले. भारत-पाकिस्तानच्या सीमेवर आग लागली आहे आणि हे सगळं होत असताना आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये बिझी आहेत. तेथे मणिपूर पेटलं आहे. मणिपूर हातामधून गेलं आहे आणि तुम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये रोड शो करत आहात. बऱ्याच गोष्टी करत आहेत. असाही टोलाही त्यांनी लगावला आहे. गृहमंत्री अमित शाह यांचा कर्नाटकमध्ये दारुण पराभव होताना दिसत आहे. गेल्या ६५ वर्षांपासून आम्ही लढा देतोय, आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, त्यांचे विचार पुढे नेतोय असं सांगणारा कोणताही मायका लाल हा बेळगाव सीमाभागात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभावासाठी पराभव करत नव्हता. असे संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.

हे ही वाचा : 

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss