Ravindra Dhangekar: काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. पुण्याचे काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यावर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे चर्चा येत होत्या. आता धंगेकर यांनी स्वतः शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपले सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या भगव्या रंगाच्या फोटोबद्दलही स्पष्टीकरण दिले आणि काँग्रेस पक्षाबद्दल असलेले आपले प्रेम व्यक्त केले.
पुण्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी मुंबईतील शासकीय निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. यावेळी रवींद्र धंगेकरांसह ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबरही उपस्थित होते. रवींद्र धंगेकर आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुण्यात लवकरच काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची वर्तवली जात आहे. रवींद्र धंगेकर आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर आता या भेटीबद्दल रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शनिवारी धंगेकर यांनी गळ्यात भगवा परिधान करून स्वतःच्या व्हाट्सअप स्टेटस ला फोटो ठेवत ‘शाह का रुतबा है’ म्हणत गाणे टाकले होते. त्यामुळे ते पक्ष सोडून शिवसेनेत जाणार अससल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर धंगेकरांनी स्पष्टीकरण देत “मी कार्यकर्त्यांसोबत बोलतो. जाताना मी लपून जाणार नाही. मला आवडलं म्हणून मी फोटो टाकला. मी शिवसेनेत चाललो अशी परिस्थिती निर्माण झाली. उदय सामंत माझे मित्र आहेत, असे सूचक विधान रवींद्र धंगेकर यांनी केले.
दोन दिवसांपूर्वी शिवजंयती होती. यानिमित्ताने मी सर्व शिवभक्तांसाठी एक छोटा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी वेगवेगळे कार्यकर्ते उपस्थित होते. मी मला जे स्टेटस आवडतात ते स्टेटसला ठेवत असतो. एखाद्या सर्वसामान्याने केलेले फोटो किंवा रिलही मी स्टेटसला ठेवतो. माझा तो फोटो खूप चांगला आला होता. मला तो आवडला. म्हणून मी टाकला. बऱ्याच दिवसांनी माझा चांगला फोटो आला त्यामुळे टाकला. मी आजारी होतो त्यामुळे तब्येत कमी झाली होती. त्या दिवशीचे अनेक फोटो आहेत. माझे सगळ्यांसोबत चांगले संबंध आहेत. अजितदादा यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. आपला जन्म भगव्या उपरणातच झाला आहे. मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. आपला मित्र आपल्यासोबत असावा, असे अनेकांना वाटतं. ऑफर देण्यात काहीही चूक नाही. मी आज कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. मी काँग्रेसमध्ये काम केलंय. काँग्रेस पक्ष प्रचंड चांगला आहे”, असेही रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. मी कार्यकर्त्यांसोबत बोलतो. पण जाताना मी लपून जाणार नाही. कार्यकर्त्यांसोबत येत्या सोमवारी किंवा मंगळवारी बोलणार आहे. यंत्रणेला टक्कर द्यायची तर मैत्री वाढवावीच लागणा आहे. अधिकारी सत्तेचे गुलाम असतात”, असेही ते म्हणाले.त्यामुळे येणाऱ्या आगामी काळात धंगेकर शिंदे गटाच्या वाटेवर असण्याची चर्चा आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसणार आहे.
Preity Zinta: लोकांना सनकी म्हणत अभिनेत्री प्रितीने झिंटाने साधला निशाणा नेमकं कोणाला व काय म्हणाली?