मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. हा प्रकरण राज्यात चांगलंच गाजत आहे.देशमुख यांच्या हत्येनंतर आरोप- प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरु आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. त्यातच आता महायुतीच्या नेत्यांकडूनही यावर सूचक विधान करण्यात आलं आहे.
गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
याबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं की, धनंजय मुंडे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही असं महाजन यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे. हसन मुश्रिफच्या आणि गिरीश महाजनच्या प्रतिक्रिया नंतर आता चर्चेला उधाण आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
विरोधकांकडून धनंजय मुंडेंवर सातत्यानं आरोप होत आहेत. गेल्या टर्ममध्ये धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र यावेळी पालकमंत्री कोण होणार? त्यामुळे दुसरं कोणाला पालकमंत्रिपद मिळणार की? पुन्हा एकदा धनंजय मुंडेच बीडचे पालकमंत्री होणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मोठं व्यक्तव्य केलं आहे. बीडचा पालकमंत्री कोण असणार याबाबत निर्णय मी अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून घेऊ, बीडमध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा