spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

अलिकडे अमित शाह सतत जे काही बोलतात त्याचा टोन अति टोकाचा असतो Sharad Pawar यांचे टीकास्त्र

कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. नाशिक येथील भाजप अधिवेशनात शाह यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना पवारांनी शाह यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार नसल्याचा आरोप केला आहे. त्यांनी शाह यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थितीत केले आणि त्यांच्या भाषणावरही टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “माझी तब्येत ठीक नाही यानंतर होणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या प्रेसमध्ये तुम्हाला उत्तरं देतील. उद्धव ठाकरे हे सतत सांगत असतात भाजपचे हिंदुत्व खरं नव्हे ते पुन्हा एकदा त्यांनी काल सांगितलं. काल दोघांनीही जे कार्यक्रम घेतले त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक गर्दी पाहायला मिळाली. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपला अधिकार आहे असं दोघांनाही वाटतं. त्याची प्रचिती काल आपण पाहिली, लोकांची उपस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक गर्दी होती. उद्धव ठाकरे यांनी याच्याआधी देखील स्वबळाबाबत मत मांडलं होतं. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे मला भेटायला आले होते, यावर आमची सविस्तर चर्चा झाली. काल उद्धव ठाकरे स्वबळाबाबत बोलले हे त्यांचे मत आहे. पण याबाबत खूप टोकाची भूमिका घेतली जाईल असं मला वाटत नाही.”

पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी सभेत फडणवीस यांच्या बद्दल बोलले नाहीत यावरून पुढचे संकेत काही मला दिसत नाहीत. पण अलिकडे अमित शाह सतत जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी घेतली आहे.अमित शाह यांचा बोलण्याचा टोन अति टोकाचा आहे. देशाचा गृहमंत्री काही तारतम्य ठेवून भाष्य करतील अशी अपेक्षा असते. पण अमित शाह यांच्याकडून तसं काही दिसून येत नाही. खरं म्हटलं तर अमित शाह यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार काही वाटत नाहीत. त्यामुळे अमित शाह कोल्हापूरात शिकले की आणखी कुठे शिकले हे मला माहिती नाही. एकनाथ शिंदे अमित शाह यांच्यासोबत असणार आहेत.ते एका पक्षाचे प्रमुख आहेत त्यामुळे सहाजिक आपला पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोसमध्ये बसून बोलताना पाहिले. परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी ते दावोसला गेले होते की फोडाफोडी करायला दावोसला गेले होते हे मला कळत नाही. उदय सामंत यांनी दावोस मध्ये जाऊन केलेली वक्तव्य मुख्यमंत्र्यांचा जो उद्देश होता त्याची सुसंगत नाही.”

काही खासदारांचे फोटो मी पाहिले आहेत, पण ते उद्धव ठाकरे यांची सेना सोडून शिंदेंकडे जातील असं वाटत नाही. ते वाटेल ते त्याग करतील मात्र, बाळासाहेबांची विचारधारा कधी सोडणार नाहीत. राज्याचा मुख्यमंत्री असताना मी देखील दावोसला गेलो होतो. मात्र काल जे करार झाले त्यापैकी अनेक कंपन्यांचे करार तीन वर्षांपूर्वी झाले होते. जिंदाल कंपनी ही महाराष्ट्रात आहेच मात्र, त्यांच्याशी करार दावोसमध्ये केला. त्यामुळे इथल्याच कंपनींना दावोसमध्ये नेऊन करार केल्याचे दिसते. दावोसमधून त्यांना महाराष्ट्रात आणलं असा दिखावा करण्यात आला. तसेच राजकीय भूकंप कधी होतो आणि कधी बाहेर पडतात याची मी वाट बघतो. अजित पवार यांच्याशी बंद दरवाजात राष्ट्रवादी पक्षाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. कोल्हापूरच्या एका साखर कारखान्याबाबत त्या ठिकाणी चर्चा झाली. यानिमित्ताने मी अजित पवार संबंधित कारखान्याचे चेअरमन आणि पदाधिकारी यांना एकत्र बोलावले, असे शरद पवार यांनी वक्तव्य केले.

हे ही वाचा : 

Latest Posts

Don't Miss