Saturday, June 3, 2023

Latest Posts

निवृत्त न्यायाधीशानी राजकीय पदे स्वीकारू नये, उज्ज्वल निकम यांचा न्यायाधीशांना सल्ला

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे करण्यात आले होते.

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे करण्यात आले होते. आज सुपारी या कार्यक्रमासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची प्रकट मुलाखत आयोजित साहित्य संमेलनामध्ये पार पडली. तेव्हा ते माध्यमांशी बोलताना राजकारणाच्या संदर्भामध्ये आणि सत्ता संघर्षाच्या बाबत त्यांनी भूमिका मांडली. या कार्यक्रमामध्ये उज्ज्वल निकम यांचा मुलगा अनिकेत निकम हा देखील उपस्थित होता. उज्ज्वल निकम यांना विचारण्यात आले की ते राजकारणामध्ये प्रवेश करणार का? यावर ते म्हणाले की, आधीच वर्षाआधीच जळगावमधून खासदारकी ऑफर आली होती या बाबतीत मला दोन तीन पक्षांनी विचारले होते.

पुढे वकील उज्वल निकम म्हणाले की, राजकर्णामध्ये पैसे लागतो एवढा पैसे जाणार कुठून? असे अनेक प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाले. राजकारणामध्ये सध्या जी अस्थिरता आणि गढूळता आहे, ते बघून राजकारणात येण्याचा सध्या माझा विचार नाही. असे वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. सत्तासंघर्षाबाबद्दलही मी बोललो आहे आणि हा घटनेने दिलेला अधिकार आहे. सध्याच्या स्थितीमध्ये लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सामान्य जनतेला अजूनही न्यायव्यवस्था हा शेवटचा आशेचा किरण वाटत आहे. दुसरीकडे प्रसारमाध्यमे काय दाखवतात या कडे सर्व सामान्य माणूस विश्वास ठेवतो असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, गेल्या बऱ्याच दिवसांपासून सत्तासंघर्ष पेटला आहे आणि या सत्तासंघर्षाबद्दल निकाल कधी लागले हे सांगणे अवघड आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश निवृत्त होणार असल्याने निकाल लवकर लागेल ही अपेक्षा आहे. याचबरोबर उच्च न्यायालयामधून अनेक न्यायाधीशांची निवृत्ती होणार आहे आणि त्यांनी या निवृत्तीनंतर राजकीय पदे स्वीकारू नये असा सल्ला त्यांनी दिला आहे.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss