spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिला सल्ला

रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकूनच मोठी चूक केली. जेव्हा आपली सत्ता आली होती, तेव्हा केंद्रात प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्रिपद दिलं होतं. मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं तरी अनेक मंत्रीपद आपल्याला मिळाली होती. त्यामुळे प्रत्यक्षपणे आपण कसे चुकलो आहोत, हेच प्रफुल्ल पटेल सांगत आहोत.

आमदार रोहित पवार हे जळगाव (Jalgaon) जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला की, राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले नाही ही शोकांतिका आहे. अनेक वर्ष एका जागेवर समाधान, चांगल्या लोकांना संधी मिळाली नाही, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना लगावला. यावर रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.

रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकूनच मोठी चूक केली. जेव्हा आपली सत्ता आली होती, तेव्हा केंद्रात प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्रिपद दिलं होतं. मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं तरी अनेक मंत्रीपद आपल्याला मिळाली होती. त्यामुळे प्रत्यक्षपणे आपण कसे चुकलो आहोत, हेच प्रफुल्ल पटेल सांगत आहोत. प्रफुल पटेल भविष्याचे पुस्तक लिहिणार आहेत, त्या पुस्तकात त्यांनी शरद पवार यांनी विश्वास टाकल्यामुळे पार्टीचा फायदा किती झाला आणि नुकसान किती झालं, हे त्यांनी त्या पुस्तकात लिहावं, असा सल्लाही रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिला. शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यावर विश्वास टाकून मोठी चूक केली. जेव्हा आपली सत्ता आली होती, तेव्हा केंद्रात प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्रिपद दिलं होतं. मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं तरी अनेक मंत्रीपदे आपल्याला मिळाली होती. आपल्या सर्वांना मंत्रीपद मिळावे, म्हणून आपल्या पक्षाने त्यावेळी मुख्यमंत्रीपद सोडलं’, असे स्पष्टीकरण आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर दिले आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या आरोपावर उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आता या विषयावर राजकारण न करता हा प्रश्न कसा सोडवता येईल, यासाठी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे. शैक्षणिक तसेच ज्या ठिकाणी संधी देता येईल, त्या ठिकाणी शरद पवार यांनी सर्वांना संधी दिली.

२०१४ मध्ये शरद पवार यांनी कुणबी समाजासाठी घेतलेला निर्णय हा सुद्धा महत्वपूर्ण ठरला. आरक्षणाचा विषय हा संसदेच्या माध्यमातून मार्गी लावता येईल, भाजपने गायकवाड आयोग नेमला, मात्र अधिवेशनात चर्चा कुठलीही केली नाही, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. राजकीय दृष्टिकोनातून बावनकुळे जर आज काहीही बोलले तर त्यांना उत्तर हे आपले शरद पवारच देतील, असेही आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मुंबईतील बैठक चांगली झाली. पाच समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. या बैठकीत एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणजे भाजप घाबरला आहे. त्यामुळे केंद्र सरकार विधानसभा-लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत बोलत असल्याचे ते म्हणाले. आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीबाबत बोलताना म्हटले की, नरेंद्र मोदी यांना मदत करण्यासाठी मग इतर पक्ष का लागत आहे. लोकांनाच भाजप नकोसे झाले आहे, आणि लोकांना ही नकोसे झाल्यामुळे हे भाजपला समजल्यामुळे भाजप घाबरले आहे. इंडिया आघाडी मजबूत होत आहे. सततच्या बैठकांमुळे भाजप दहशतीत आहे. तत्पूर्वी निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे.

हे ही वाचा:

गश्मीर महाजनी दिसणार नवीन भूमिकेत

गिरीश महाजनांनी विचारला विरोधकांना सवाल ???

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss