Rohit Pawar on Actor Rahul Solapurkar: अभिनेते राहुल सोलापुरकर (Actor Rahul Solapurkar) यांनी एका यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत एक वादग्रस्त विधान केले. त्यांनी केलेल्या विधानामुळे आता राजकीय विश्वात गदारोळ माजला आहे. अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलेल्या भाष्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीकेची तोफ डागली आहे. रोहित पवार यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत अभिनेत्याचा समाचार घेत इशारा दिला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
अडगळीत पडलेल्या एका अभिनेत्याने चर्चेत येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्लाघ्य विधान केलं नाही ना? तसं नसेल तर या विधानामागील हेतू आणि सडका मेंदू कुणाचा आहे हे शोधणं गरजेचं आहे. काही वेडपट माणसं छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी चुकीची विधानं कुणाच्या आशीर्वादाने करतात? महापुरुष हे केवळ महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी नाही तर सर्वांसाठीच पूजनीय आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी वादग्रस्त विधानं करणं थांबवलं पाहिजे, अन्यथा अशा महाभागांना मराठी माणूस जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही…
अभिनेते राहुल सोलापुरकर यांचं विधान काय होतं?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पेटारे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावेही इतिहासात आहेत. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की, थोडे रंग भरून सांगावा लागतो. पण, रंजकता आली की, इतिहासाला छेद दिला जातो.
हे ही वाचा :
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर ! गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.१९ टक्क्यांनी वाढ