राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच सर्व राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. अश्यातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावरून राजकीय वातावरण तापले असून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अमित शाह यांनी काल (शनिवार, १० नोव्हेंबर) एका सभेत बोलताना शरद पवारांवर तुफान टीका केली. ‘शरद पवारांनी इतकी वर्षे महाराष्ट्राला काय दिले?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापले असून रोहित पवार यांनी यावरून अमित शहांवर चांगलीच आगपाखड केली आहे. आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत “आपण महाराष्ट्रात आला आहातच तर आपण महाराष्ट्रातून गुजरातला काय काय नेलं, याचाही हिशोब द्या” असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
रोहित पवारांचा ‘X’ पोस्टमधून अमित शहांवर हल्लाबोल
रोहित पवार म्हणाले, “पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? असा हिशोब अमित शाह साहेबांनी लोकसभा निवडणुकीत मागितला असता महाराष्ट्राने मतदानाच्या रूपाने खणखणीत उत्तर दिलं आणि भाजपा खासदारांची संख्या २३ वरून ९ पर्यंत खाली आणली. आज अमित शाह साहेबांनी पुन्हा हिशोब मागितला, आता येणाऱ्या २० तारखेला महाराष्ट्र मतदानातून पुन्हा हिशोब देईल पण हा हिशोब व्याजासकट असेल.”
“मा. शाह साहेब आपण महाराष्ट्रात आला आहातच तर आपण महाराष्ट्रातून गुजरातला काय काय नेलं, याचाही हिशोब द्या आणि वेदांता Foxconn गुजरातला नेण्यात पंतप्रधान मोदीं साहेबांचा संबंध होता की नाही हेही सांगा. आहे का हिम्मत भाजप नेत्यांमध्ये?”
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…