Friday, June 2, 2023

Latest Posts

रोहित पवार यांनी साधला प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एकमेकांच्या विरोधातील प्रतिक्रिया अनेकवेळा येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी आता आंबेडकरांना एक सल्ला दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एकमेकांच्या विरोधातील प्रतिक्रिया अनेकवेळा येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी आता आंबेडकरांना एक सल्ला दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी ‘आपलं शरद पवार यांच्याशी जुनं भांडण’ असल्याचं जाहीरपणे सांगितलं. आंबेडकरांनी ठाकरे गटाशी युती केली असली तरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसने याबाबत भूमिका घेतलेली नाही. यावेळी यासंधीचा फायदा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या पक्षानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आम्हालाही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मात्र अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होऊनये यासाठी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांच्या पक्षानं मागच्या निवडणुकांमध्ये प्रचंड मते खाल्ली. त्यामुळे भाजपचे ७ खासदार आणि २२ आमदार निवडून आले, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. मनभेदही नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन लढलं पाहिजे. महाविकास आघाडी त्याच भूमिकेने काम करत आहे. भाजपच्या विरोधात लोकांचा रोष आहे, नाहीतर जनता आपल्यालाही सोडणार नाही, असं रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना संवाद साधला.

त्याचबरोबर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ आहे, असं विधान राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. त्यावरही रोहित पवार यांनी या वक्तव्यावरून प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार आकड्यांवर बोलतात.आजच्या घडीला राष्ट्रवादीकडे जास्त आमदार आहेत. शरद पवार मोठे मार्गदर्शक आहेत. त्यांचा अनुभव पाहता अनुभवाने राष्ट्रवादी हा मोठा भाऊ आहे. त्याचा अर्थ असा नाही की आम्ही जास्त जागा मागणार किंवा कमी मागणार. मात्र राष्ट्रवादी मोठा भाऊ आहे असं म्हणणं हे योग्य आहे त्यात काही वावगं नाही .त्याचेबरोबर यावेळी रोहित पवारांनी राज्य सरकारवरही गंभीर आरोप केला. राज्यात ५० टक्के कमिशनचा रेट सुरू आहे. पैसा कोणापर्यंत जातो माहिती नाही. मात्र राजकारणासाठी आणि लोकांना फोडण्यासाठी हे पैसे वापरले जातात. पैसे खिशातून जात नाही. एवढा पैसे कुठून येतो याचा अंदाज आता सामान्य लोकांना आला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडली होती. या प्रकरणात बाहेरच्यांनी लक्ष घालू नये. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांवर तो प्रश्न सोपवा, असं राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं रोहित पवार यांनी स्वागत केलं आहे. ते आता सत्याच्या बाजूने आले आहेत, असं देखील रोहित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

वानखेडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर २२ मे रोजी सुनावणी होणार

शरद पवार यांनी अहमदनगरमधून कोणाला लगावला टोला ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss