Friday, December 1, 2023

Latest Posts

रोहित पवारांचा सरकारला इशारा, मराठवाड्यात दुष्काळ जाही करा; अन्यथा…

रोहित पवारांचा सरकारला इशारा, मराठवाड्यात दुष्काळ जाही करा; अन्यथा...

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांची भेट घेतली. यावेळी संपूर्ण मराठवाड्यात दिवाळीपूर्वी दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली. शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने यावर गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा १० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला आहे. रोहित पवार हे बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी, त्यांनी शेतकऱ्यांना भेटून चारा, जनावरांच्या आणि लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या परिस्थितीची माहिती शेतकऱ्यांकडून घेतली. त्यानंतर रोहित पवार यांनी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांची भेट घेऊन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत याबाबत निवेदन दिले. तसेच, दिवाळीच्या आधी मराठवाड्यात दुष्काळ जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला.

मराठवाड्यात दुष्काळी सवलत लागू करावी

यासंदर्भात ट्वीट करत रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “मराठवाड्यातील एकूण ७६ पैकी ६० तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असूनही, त्यातील केवळ १४ तालुक्यांमध्येच दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. शिवाय मागील वर्षीच्या अतिवृष्टीचं जाहीर केलेलं हेक्टरी १३ हजार रुपयांचं अनुदानही अद्याप शेतकऱ्यांपर्यंत मिळालेलं नाही. राज्यभरात इतरत्रही अशीच परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी सवलती लागू कराव्यात आणि मागील वर्षीच्या अतिवृष्टीचं अनुदान व पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन मराठवाडा विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे सुपूर्त केले असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.

रोहित पवारांचे विभागीय आयुक्तांना हे निवेदन…

यंदा मराठवाड्यात पाऊस कमी प्रमाणात झालेला असल्याने जवळपास संपुर्ण मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, पाणी, तसेच शेतीसाठी लागणारं पाणी याची फार मोठी समस्या मराठवाड्यात निर्माण झालेली आहे.पावसाभावी दुबार पेरणी करूनही खरीप हंगामाचा खर्च निघू शकलेला नाही, तर रब्बी हंगाम घेण्यासारखी परिस्थितीही राहिलेली नाही.मराठवाड्यातील ७६ पैकी ६० तालुक्यांमध्ये यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाउस झालेला आहे. अशी गंभीर वस्तुस्थिती असतांना देखील शासनाने मराठवाड्यातील ७६ पैकी केवळ १४ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेले आहे.

हे ही वाचा : 

बागेश्वर बाबांच्या दरबारात १० जणांनी घरवापसी करत स्वीकारला हिंदू धर्म

आजचे राशिभविष्य, ०९ नोव्हेंबर २०२३; मानसिक ताणतणावर मात करण्यासाठी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss