spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

बदलापूर एन्काऊंटरच्या न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया

बदलापुरात दोन लहान मुलींवर शाळेत अत्याचार करण्यात आला होता. त्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. आता या आरोपीची पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आल्यानंतर सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आल्यामुळे आता याप्रकरणी न्यायालयीन समितीचा अहवाल समोर आला आहे. बदलापूर आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आला आहे. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे. आता, याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोर्टाचा निर्णय सरकारला चपराक म्हणता येणार नाही. बदलापूरमधील एन्काऊंटर प्रकरणाची माहिती घेऊन बोलेन. पण, महाराष्ट्र असुरक्षित असल्याची विधाने विरोधक करतात, निवडणुकीतील पराभवामुळे ते आरोप करत आहेत, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. तसेच, फेक एन्काऊंटर घटनेसंदर्भात आयोगाकडे कुठलीही तक्रार नाही. पण, माहिती घेऊन व्यक्ती दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई नक्की करू. आयोगाकडे तक्रार आल्यावर कोणालाही सोडणार नाही, सगळया घटनांचा पाठपुरावा करू, सगळी महिती आता समोर आली आहे. सरकार सगळ्या गुन्ह्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊन कारवाई करत आहे, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

विरोधकांना या घटनेत केवळ राजकरण करायचं आहे

महाराष्ट्राची बदनामी हे लोक करत आहेत का, हा एक प्रश्न तर दुसरीकडे स्वतः महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारल्याचे नैराश्य, गेलेला आत्मविश्वास आणि याच्यामुळे सातत्याने अशी विधान केली जातात असं मला वाटतं, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं. कुठल्याही घटनेवर विरोधक टीका करत असतात, लोकांनी संदेश दिला आहे घरी बसा, तरीही ते असे उठसूट आरोप करतात, हे विधानं करणं चुकीचं आहे. विरोधकांना या घटनेत केवळ राजकरण करायचं आहे, राज्याला बदनाम करण्याचं काम हे लोकं करतं आहेत, असे म्हणत विरोधकांकडून सरकारवर होणाऱ्याआरोपांवरुन चाकणकर यांनी पलटवार केला आहे.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss