राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीवर (Mahayuti) हल्लाबोल केला.
सचिन पाटील यांनी आज (रविवार, १७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत महायुतीवर टीकास्त्र सोडले. ते यावेळी म्हणाले, “लोकसभेत इथली जनता महविकास आघाडीच्या मागे उभा राहिली. त्यामुळे राज्यात भाजपचा आकडा घटला. डबल इंजिन सरकार म्हणत आहे. महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे, मात्र, आम्ही पढोगे तो आगे बढोगे, अशी घोषणा देतो आहोत. पाकिस्तान, हिंदुस्थान, मुसलमान, मंदिर, मस्जिद हे मुद्दे समोर आणले जात आहेत. भाजपने नोटबंदी केली. यामुळे देशात ऐतिहासिक बेरोजगारी निर्माण झाली आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील दरी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेनासा झाला आहे.”
ते पुढे म्हणाले, “आम्हाला राज्यात पसंती मिळत आहे. लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. भाजपाच्या लोकांनी त्यांनी केलेली कामे लोकांसमोर मांडावीत. आज भाजप पूर्णपणे उघड झाली आहे. १४७ खासदारांना निलंबित केले. भाजप फक्त सत्तेसाठी राजकारण करत आहे. एक हे तो सेफ हे. या अशा घोषणांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होते आहे. महिलांना मदत, रोजगार, कृषी या विषयावर भाष्य करत नाहीत. ४५० चा गॅस साडे अकराशे रुपयांना झाला. तुमच्या दीड हजार रुपयांत काय होणार आहे? जनता याला बळी पडणार नाही. आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. अनेक जागेवर भाजपने बंडखोर उभे केले आहेत. राज्यात स्पष्ट बहुमताने आमचे सरकार येईल. लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत आहोत. अयोध्येत भाजप हरली. इलेक्टराल बाँड गैर असल्याचे सांगितल्यानंतर भाजपने पैसे वापस द्यायला हवे होते.”
ते पुढे म्हणाले, “हेलिकॉप्टर चेकिंग करण्यापेक्षा अॅम्ब्युलन्स, पोलिस वाहने तपासा. त्याचा वापर सरकार करू शकते. शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. मग भाजप त्यांना परत मुख्यमंत्री करतील का, असे भाजपने घोषित करावे. अनेकजण इच्छा बाळगून आहेत. मात्र, आमचेच सरकार येईल. लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत आहोत.”
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…