spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या आमदार विरोधात दाखल केली याचिका; याचिकेत काय

शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या आमदारा विरुधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या उमेदवारीला आवाहन देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २८ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माहीम विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. आता माहीम विधानसभेत पुन्हा एकदा ट्विस्ट येणार का?, अशी चर्चा रंगली आहे.

याचिकेत आरोप काय?

याचिकेत महेश सावंत यांनी निवडणुक प्रतिज्ञापत्रार चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप सदा सरवणकरांनी याचिकेतून केला आहे. गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञपत्रात दाखवणे आवश्यक मात्र जनतेची दिशाभुल करुन स्वत वरील चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवली, असा आरोप महेश सावंत यांच्यावर याचिकेतून केला आहे.

कोण आहेत महेश सावंत?

शिवसेनेत बंड झाल्यानंतर महेश सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. महेश सावंत 1990 पासून शिवसेनेत सक्रीय आहेत.महेश सावंत यांचे वडील देखील शिवसेनेत कार्यरत होते. सावंत यांची ओळख माहीमचे आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक अशी होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी सदा सरवणकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळी महेश सावंत यांनी देखील त्यांच्यासोबत पक्ष सोडला होता. मात्र, महेश सावंत पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. आता 2024 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महेश सावंत हे सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंचा पराभव करत आमदार झाले.

Latest Posts

Don't Miss