spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

Sada Sarvankar यांनी ‘राजपुत्रा’ वर केला हल्लाबोल; म्हणाले,”डिपॉझिट वाचले…”

संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. २३ नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सभा सुरु आहेत. अशातच आता माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांचे डिपॉझिट वाचले तरी खूप मोठी गोष्ट आहे अशी खोचक टीका शिंदे हाताचे उमेदवार सदा सरवणकर यांनी केली आहे. भाजपचे पदाधिकारी आमच्यासाठी काम करतील अमित ठाकरे यांच्यासाठी नव्हे, या निवडणुकीत भाजप आमच्यासोबत आहे, असेही सदा सरवणकर यांनी म्हटले आहे. सदा सरवणकर यांनी आज दि. १७ नोव्हेंबरला माहीम मतदारसंघात रॅली काढली होती. ही रॅली शिवसेना भवन समोरून गेली. यावेळी सदा सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांना डिवचले.

काही दिवसांपूर्वी प्रभादेवी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले होते. त्यामुळे प्रिया सरवणकर यांनी माहीममधील आजच्या रॅलीचे नेतृत्त्व केले. यावेळी प्रिया सरवणकर यांनी म्हटले की, माहिमचा मुस्लिम समुदाय आमच्यासोबत आहे. अमित ठाकरे यांना यंदा मनसेकडून लाँच करण्यात आले आहे. लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. माहीम विधानसभेत मुस्लिम समुदाय महाविकास आघाडीसोबत नाही. हा समुदाय सदा सरवणकर यांच्या बाजूने असल्याचा दावा प्रिया सरवणकर यांनी केला.

माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे, उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि शिंदे गटाचे सदा सरवणकर अशी तिहेरी लढत होणार आहे. महेश सावंत यांनी आज शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर श्रद्धांजली वाहून बाहेर पडल्यावर प्रसामाध्यमांशी बोलले की, बाळासाहेबांचा स्मृतिदिन जो आमच्यासाठी काळा दिवस आहे. साहेब आमच्या हृदयात कोरले आहेत. आम्ही शिवाजी पार्कमध्ये दिवस रात्रभर बसतो. बाळासाहेबांना नतमस्तक होऊन आमच्या दिवसाची सुरुवात होते. माझा प्रचार चांगला सुरु आहे. माहीम मतदारसंघातील सर्व समाजाने मला पाठिंबा दर्शवला आहे असे महेश सावंत यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

Ashish Shelar Exclusive Interview: आपल्या मित्राला मदत करण्याचा हा राजकीय डाव?

बटेंगे तो कटेंगे म्हणता, मग कटणार कोण ते सांगा, प्रकाश आंबेडकर यांचा भाजपवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss