राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच आता राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्या करू लागले आहेत. अश्यातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलं आहे.
जत विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ आज (बुधवार, ६ नोव्हेंबर) महायुतीकडून जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवारांवर जोरदार प्रहार केला. शरद पवारांना महाराष्ट्राचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का? अश्या शब्दांत त्यांनी टीका केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
आपल्या भाषणात सदाभाऊ खोत म्हणाले, “शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसवाले देवेंद्र फडणवीसांना रायला लागले आहेत. का माहितीये? कारण आपण शेतकरी माणसं आहोत. आपल्या घरात गाय असते. राज्याची तिजोरी म्हणजे हि गाय आहे. गायीची जी कास आहे, त्या कासेला चार थान आहेत, यामधील अर्ध थान वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला पाजायचं आणि साडेतीन थान दूध आपणच हाणायच. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, हि चारही थान मी वासरांनाच देणार. यानंतर शरद पवारांना नववा महिना लागला. पवारसाहेब म्हणाले, आता माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांच कसं होणार?”
“शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणला, पण एवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा…? महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार काय? गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे काम कोणी केले असेल ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
Devendra Fadnavis यांचे Rahul Gandhi यांच्यावर टीकास्त्र; म्हणाले,”मग लाल संविधान कशासाठी?”
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर