spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर केली खालच्या पातळीवरची टीका…, ट्विट करत अजित पवार कडाडले, म्हणाले…

मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे.

मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत आणि पुढे तीन दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे १३ दिवस उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाक लावला आहे, सभांचा धुरळा उडालाय. तसेच प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र आरोप प्रत्यारोपाचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. मात्र अश्यातच बोलताना माणसाचं भान सुटलं तर जीभ घसरते. असंच काहीस महायुतीच्या सभेत जतमध्ये सदाभाऊ खोत यांच्यासोबतही झालं. आणि त्यांच्या त्याच वक्तव्यावरून मात्र अजित पवार यांनी चांगलंच फटकारलं आहे.

महायुतीच्या प्रचारसभेत जतमध्ये भाषण करताना त्यांनी राज्यातीलच नव्हे देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेले ज्येष्ठ राजकारणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या आजारपणावरुन बोलत जे वक्तव्य केलं आणि त्याच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा राजकारण पेटून उठले आहे. या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. तर शरद पवार यांचे पुतणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही हे वक्तव्य रुचलं नसून त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य काय ?

जतमधील महायुतीच्या सभेत बोलताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना पातळी सोडली. शरद पवार यांच्या आजारपणावरुन वक्तव्य करताना “आता महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?”, असा खोचक सवाल खोत यांनी विचारला. “महाराष्ट्र बदलायचा आहे म्हणजे तुम्हाला कसला चेहरा पाहिजे?” असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत खोत यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. “ पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, असं सदाभाऊ खोत म्हणाले.


काय म्हणाले अजित पवार ?

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अजित पवार यांनी एक पोस्ट शेअर करत सदाभाऊ खोत यांना चांगलंच फटकारलं आहे. खोत यांचं हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे असे म्हणत अजित पवार यांनी त्यांना चांगलंच फटकारलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘ ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही’ अशा शब्दांत अजित पवार यांनी थेट इशाराच दिला आहे.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणावरून Raj Thackeray यांचा Manoj Jarange यांना टोला; म्हणाले, “तुम्हाला लढायचे लढा नाही तर…”

अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss