Thursday, March 28, 2024

Latest Posts

‘सामना’तून थेट पवारांवर निशाणा, गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

गेल्या काही राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात अनेक घडामोडी या घडत होत्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणजेच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

गेल्या काही राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात अनेक घडामोडी या घडत होत्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणजेच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आणि त्यांच्या या राजीनाम्यामुळे राजकारणात अनेक चर्चाना उधाण हे आले होते. तर राजकीय क्षेत्रात देखील चांगलीच खळबळ ही उडाली होती. पवारांनी सर्वांच्या आग्रहाखातर हा राजीनामा शरद पवार यांनी मागे घेतला. परंतु आज थेट ‘सामना’ च्या अग्रलेखातून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी आहेत असा थेट आरोप आज करण्यात आला आहे.

आज दिनांक ८ मे रोजी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणजेच शरद पवार यांच्यावर भाष्य करण्यात आले आहे. शरद पवार हे एक राष्ट्रीय नेते आहेत. शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार हे समीकरण सर्वांचे तोंडपाठ झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला. तपरंतु शरद पवार यांच्या नंतर हा पक्ष पुढे घेऊन जाणारे नेतृत्व पक्षात अजून उभे राहू शकले नाही आहे. याच गोष्टीवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून आज थेट शरद पवारांवर यांच्यावर हल्लाबोल हा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी हा पक्ष पुढे नेणारा वारसदार शरद पवार निर्माण करू शकले नाहीत. त्यात शरद पवार अपयशी ठरले आहेत, असं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला. असं देखील अग्रलेखात म्हंटल आहे.

तसेच पुढे अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे की, भाजपने पवारांच्या राजीनाम्यावर नौटंकी आहे. भाजप हा एक पोटदुख्या पक्ष आहे. त्यांना दुसऱ्यांचं चांगलं व्हावं किंवा घडावं असं कधीच वाटत नाही. इतरांचे पक्ष मोडून उभा राहिलेला हा पक्ष आहे. राष्ट्रवादीला नौटंकीबाज म्हणण्यापूर्वी भाजपने सर्वात मोठे नौटंकीबाज म्हणून ख्यातकीर्त असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहावे, असा टोला अग्रलेखातून लगावला आहे. तसेच शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली. अशा शब्दात सामना अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss