मराठा आरक्षणासाठी मागील कित्येक दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. सध्या अंतरवाली सराटी गावात पुन्हा उपोषण सुरू झालेले असताना राज्यभरातून आंदोलने करण्यात येत आहेत. सकल मराठा समाजाच्यावतीने प्रत्येक तालुक्यांत साखळी उपोषणे सुरू करण्यात आली आहेत. संभाजी ब्रिगेडही यामध्ये आक्रमकपणे उतरली आहे. २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडतर्फे नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन इशारा देण्यात आला आहे.
नगरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाध्यक्ष गिरीश जाधव यांच्यासह संभाजी ब्रिगेड, मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सावंत म्हणाले, ”मराठा आरक्षणासाठी निराशेच्या भावनेमधून मराठा तरूण आत्महत्या करत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचे ठाम मत तयार झाले आहे. राज्यकर्ते म्हणून मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणे, ही राज्य व केंद्र सरकारची जबाबदारी आहे.
शिर्डीतील सभेत नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडावी, अन्यथा शेकडो मराठा तरुणांना घेऊन सरळ जाहीर सभेत घुसून जाब विचारण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी दिला.सरकार गोड-गोड बोलून वेळ मारून नेत आहेत. आता जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे होणाऱ्या सभेत मराठा आरक्षण विषयावर जाहीर भूमिका मांडून मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे व कायद्याच्या कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण देण्याची हमी देऊन मराठा समाजाला केले पाहिजे. अन्यथा सभेत शिरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
Gaza साठी भारत बनला देवदूत, ३८ टन अन्नासह वैद्यकीय उपकरणे…
तुमचा मोबाईल गरम होतो का? मग ‘हे’ उपाय करा